Myths and facts about periods Saam Tv
लाईफस्टाईल

Myths and facts about periods : मासिक पाळीच्या काळात महिलांना स्वयंपाकघरात प्रवेश का नसतो? जाणून घ्या कारण

मासिक पाळी आल्यानंतर आई- आजी आपल्याला मसाल्यांच्या पदार्थांपासून पण दूर राहायला सांगते.

कोमल दामुद्रे

Myths and facts about periods : अनेक काळापासून महिलांना असे सांगितले जाते की, मासिक पाळी आल्यानंतर किचनमध्ये, देवघरात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी हात लावयचा नाही. तसेच या काळात केस धुणे, व्यायाम केल्याने आरोग्यावर परिणाम होतो.

मासिक पाळी आल्यानंतर आई- आजी आपल्याला मसाल्यांच्या पदार्थांपासून पण दूर राहायला सांगते. कधी चुकून लोणच्याला बरणीला हात लागला की, लोणचे खराब होते असे देखील म्हटले जाते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला या सर्व समजांमागील सत्य सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया

1. मासिक पाळीत लोणच्याला हात लावावा की नाही?

प्राचीन काळापासून लोकांचा असा समज आहे की मासिक पाळीच्या वेळी लोणच्याला हात लावल्यास लोणचे खराब होते किंवा सडते. यामागे आजकाल स्त्रिया (Women) 'अपवित्र' असल्यामुळे लोणचे बिघडतात अशी लोकांची धारणा आहे. मात्र या प्रकरणात तथ्य नाही. खरंतर पाळीचा आणि लोणच्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. लोणचे हे खाण्यायोग्य पदार्थ आहे जे व्यवस्थित न ठेवल्यास खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत या प्रकरणात काहीही तथ्य नसून तो पूर्णपणे मूर्खपणा आहे.

2. मासिक पाळीबद्दल मिथक आणि तथ्ये

गैरसमज - मासिक पाळी दरम्यान केस धुवू नयेत.

तथ्य- मासिक पाळी दरम्यान केस न धुण्याचा सल्ला दिला जातो कारण रक्त प्रवाह जास्त असू शकतो. पण, हे अजिबात खरे नाही. खरं तर मासिक पाळीत केस धुण्याचा विशेष संबंध नाही. जर तुम्ही मासिक पाळी दरम्यान केस (Hair) धुत असाल तर त्याचा तुमच्या मासिक पाळीवर फारसा परिणाम होत नाही.

Myths and facts about periods

3. गैरसमज - पीरियड्स दरम्यान व्यायाम करू नये ?

वस्तुस्थिती- मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम करण्याबद्दल वृद्ध लोक विचार करतात की त्याचा तुमच्या शारीरिक आरोग्यावर (Health) वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे, तुम्हाला अधिक पीरियड क्रॅम्प्स होण्याचा धोका असतो. त्याच वेळी, मासिक पाळी दरम्यान हलका व्यायाम केल्यास आपण पीरियड क्रॅम्पपासून देखील मुक्त होऊ शकता

4. गैरसमज - मासिक पाळी दरम्यान स्वयंपाकघरात पाऊल टाकू नये ?

वस्तुस्थिती- किचन आणि पीरियड्स यांचा एकमेकांशी विशेष काही संबंध नाही. त्या काळात तुम्ही स्वच्छतेने राहात असाल तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्वयंपाकघरात जाऊ शकता. याचा तुमच्या स्वयंपाकघरात कोणताही वाईट परिणाम होत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT