सकाळचा दिनक्रम ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
आवळ्याचा रस, मेथी पाणी आणि योगा शरीरातील ग्लुकोज संतुलित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
सकाळचा नाश्ता स्किप करू नये.
डायबिटीज या आजारामध्ये सगळ्याच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष ठेवणे जास्त महत्वाचे आहे. कारण जेव्हा तुमच्या रक्तातल्या साखरेचे प्रमाण वाढते. तेव्हा थकवा, चक्कर येणे, डोके दुखी, छातीतली धडधड वाढणे, खूप घाम येणे अशा अनेक समस्यांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे तुम्ही काही घरगुती उपाय करून या समस्यांवर नियंत्रण मिळवू शकता.
डायबिटीजच्या रुग्णांनी शुगर कंट्रोल ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण याच्या लेव्हलमध्ये सतत चढ उतार होत असेल तर हार्ट, किडनी, डोळे आणि नसांना नुकसान पोहोचू शकतं. डायबिटीजचे तज्ज्ञ ब्लड शुगर नॉर्मल करण्यासाठी सकाळी उठल्यावर स्टेप्स रोजच्या आयुष्यात फॉलो करण्याचा सल्ला देतात.
तज्ज्ञांच्या मते, डायबिटीजचे रुग्ण सकाळी दिवसाची सुरुवात योग्य प्रकारे केल्याने त्याचा ब्लड शुगर लेवल दिवसभर नियंत्रणात राहू शकतो. सकाळी काही नॉर्मल योगा, आवळ्याचा रस, मेथीच्या दाण्यांचे पाणी आणि ध्यान केल्याने शरीरातील ग्लुकोज लेव्हल संतुलित राहतो. तसेच इंसुलिन सेंसिटिव्हिटी वाढते आणि ताण कमी होतो. हे तिन्ही घटक डायबिटीज नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक मानले जातात.
अनेक डायबिटीज रुग्णांना Dawn Phenomenon जाणवतो. त्यामध्ये सकाळी २ ते ८ वाजेच्या दरम्यान ब्लड शुगर अचानक वाढतं. काही रुग्णांमध्ये सोमोजी इफेक्ट देखील दिसतो. त्यामध्ये रात्री इन्सुलिन घेतल्यानंतर सकाळी शुगर लेव्हल जास्त वाढलेला दिसतो.
सकाळी उठल्यावर काही मिनिटे बिछान्यावरच श्वसनाचा सराव केला पाहिजे. यामुळे शरीरातील ऑक्सिजन पुरवठा आणि रक्ताभिसरण सुधारतं. तसेच आवळ्याचे सेवन केले पाहिजे. कारण त्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तुम्ही रात्रभर भिजवलेले मेथीच्या दाण्यांचे पाणी सेवन करू शकता. त्याने तुमची साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
सकाळी १५ ते २० मिनिटांचा योगा करावा. मॉर्निंग वॉकचा शेड्यूलमध्ये सहभाग करून घ्यावा. योगामुळे स्नायूंमध्ये रक्तप्रवाह सुधारतो आणि ग्लुकोजचा उपयोग चांगला होतो. ताडासन, कोणासन, भुजंगासन, मत्स्यासन ही आसने डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. तसेच सकाळचा नाश्ता स्किप करू नये. त्यानेच दिवसाची सुरुवात होत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.