Blood Sugar Level Tips: औषधांशिवाय ब्लड शुगर लेवल कमी करायचीये? घरच्या घरी करा सोपे उपाय

6 tips to lower your blood sugar: तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय पुढील माहिती द्वारे मिळतील.
6 tips to lower your blood sugar
Blood sugar levelsaam tv
Published On

आजच्या धकाधकीच्या जीवनात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच मधुमेहाचा त्रास होत आहे. त्याची प्रमुख कारणे अनियमित दैनंदिन दिनचर्या, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव आहे. तुमची सतत वाढत जाणारी रक्तातील साखरेची पातळी यापासून तुम्हाला सुटका मिळवायची असेल, तर तुम्ही खाली नमूद केलेल्या काही सोप्या पद्धतींचा अवलंब करू शकता. मधुमेह ही एक समस्या आहे जी आज लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करत आहे.

अनियमित दैनंदिन दिनचर्या, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे लोकांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. हा एक असा आजार आहे ज्याचा किडनी आणि हृदयाच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज या लेखात आम्ही तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. खरं तर, नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचा अवलंब करून तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता, तर चला जाणून घेवू.

6 tips to lower your blood sugar
House Plants : 'या' झाडांमुळे होऊ शकते त्वचेची ऍलर्जी; खिडकीत असतील तर आजच काढा घराबाहेर

दररोज व्यायाम करा

जर तुम्ही नियमित व्यायाम केला तर तुमच्या रक्तातील साखर नक्कीच नियंत्रणात राहते. व्यायामामुळे स्नायूंमध्ये ग्लुकोजचा वापर वाढतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

फायबर युक्त पदार्थांचे सेवन करा

फायबर रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी उपयुक्त आहे. आपल्या आहारात याचा समावेश करण्यासाठी हिरव्या भाज्या, फळे आणि सुक्या मेव्याचे सेवन करा. यामुळे पचन क्रिया वाढते आणि साखरेची पातळी कमी होऊ लागते.

भरपूर पाण्याचे सेवन करा

पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. हे टाळण्यासाठी दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाण्याचे सेवन करा. त्यामुळे मूत्रपिंडातील अतिरिक्त साखर काढून मूत्रपिंड साफ होण्यास मदत होते.

पुरेशी झोप घ्या

चांगली झोप आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वास्तविक झोपेच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतच जाते. त्यामुळे दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे.

ताण घेऊ नका

तणावाचा थेट परिणाम आपल्या रक्तातील साखरेवर होतो. जर तुम्हाला तणावातून आराम मिळवायचा असेल तर दररोज ध्यान आणि योगासने करा. यामुळे तुम्ही तणावमुक्त व्हाल आणि आतून फ्रेशही राहाल.

वजन नियंत्रणात ठेवा

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुमचे वजन नियंत्रणात ठेवणे हा महत्त्वाचा भाग आहे. सकस आहार आणि नियमित व्यायामाने वजन नियंत्रणात ठेवा. यामुळे तुम्हाला मधुमेहाचा त्रास होणार नाही.

टिप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited By: Sakshi Jadhav

6 tips to lower your blood sugar
Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com