Fitness Mistakes google
लाईफस्टाईल

Fitness Mistakes: दररोज १०००० पावलं चालताय, पण रिझल्ट झिरो! संशोधनातून ही ५ कारणं आली समोर

Walking 10000 Steps No Results: दररोज चालूनही वजन किंवा फिटनेसवर परिणाम दिसत नसेल, तर चालताना होणाऱ्या सामान्य चुका कारणीभूत असू शकतात. जाणून घ्या संशोधनातून समोर आलेली महत्त्वाची कारणं.

Sakshi Sunil Jadhav

सध्या लोक फिटनेसवर जास्त लक्षकेंद्रीत करताना पाहायला मिळतायेत. त्यासाठी योग्य डाएट, महागड्या जीम, स्विमींग अशा प्रकारचे रुटीन लोक फॉलो करतायेत. पण काहींना जीमला जायला किंवा डाएटसाठी फार वेळ मिळत नाही. अशावेळेस ते चालण्याचा पर्याय निवडतात. चालणं हा सगळ्यात सोपा आणि महत्वाचा व्यायाम असला तरी त्याने काहींच्या शरीरावर फारसा फरक जाणवत नाही. अशा वेळेस काही नकळत घटणाऱ्या चुकांवर लक्षकेंद्रीत केले पाहिजे.

दररोज १० हजार पावलं चालणं हा सगळ्यांच्या आवडीचा आणि सोपा मार्ग झालाय. याने वजन कमी होतं, स्ट्रेस कमी होतो, पचन शक्ती सुधारते आणि माणून एकदम फिट राहतो. दैनंदिन आयुष्यात या काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.

चालताना शरीराची ठेवण (पोश्चर) योग्य नसेल, तर त्याचा थेट परिणाम मणक्यावर आणि मानेला होतो. अनेकजण चालताना सतत मोबाईल पाहतात, त्यामुळे मान पुढे झुकते आणि पाठ वाकते. अशा चुकीच्या पोश्चरमुळे मान दुखते, पाठदुखते, लवकर थकवा आणि झोपेच्या तक्रारी निर्माण होतात.

चालताना वापरल्या जाणाऱ्या चपला किंवा बुटांचाही मोठा प्रभाव पडतो. चुकीचे किंवा घट्ट बूट वापरल्यास पाय दुखणं, गुडघे व पाठदुखी, तसेच सांध्यांच्या समस्या उद्भवू शकतात. चालण्यासाठी योग्य बूट निवडताना आतून मऊ कुशन, टाचेला योग्य आधार आणि बोटांना पुरेशी जागा असणं गरजेचं असतं.

चालणं हलका व्यायाम वाटत असला, तरी त्यातही शरीरातून पाणी कमी होतं. अनेकदा लोक चालण्यापूर्वी किंवा नंतर पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे चक्कर येणं, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणं दिसू शकतात.

वॉर्म-अप न करता थेट चालायला सुरुवात करणं ही आणखी एक सामान्य चूक आहे. स्नायू तयार नसताना अचानक हालचाल केल्यास ताण, दुखापत किंवा वेदना होऊ शकतात. यामुळे स्नायू लवचिक राहतात आणि दुखापतीचा धोका कमी होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT