Diabetes Health Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Health : मधुमेहींनो, तुम्ही देखील 'शुगर फ्री' पदार्थ खाताय? WHO ने सांगितले हे 'विष'च; जाणून घ्या कारण

Diabetes Causes : बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, तणावामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे.

कोमल दामुद्रे

Sugar Free Food : अलीकडे संपूर्ण भारतात मधुमेहग्रस्तांचा विळखा अधिक प्रमाणात आढळून आले. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, तणावामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे.

गोड पदार्थ खाल्ल्याने आरोग्याचे अनेक गंभीर नुकसान होते. त्यामुळे मागच्या काही काळापासून साखर नसलेल्या गोडाच्या पदार्थांचा वापर केला जातो. WHO ने याबाबत काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. या शुगर फ्री पदार्थांचा वापर अधिक काळ केल्यास आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

WHO च्या मते, साखर (Sugar) नसलेल्या गोड पदार्थांचा आहारात सतत वापर केल्यास प्रौढांमध्ये टाइप 2 मधुमेह, हृदयरोग (Heart Disease) आणि मृत्यूचा धोका वाढू शकतो. इतकेच नाही तर यामुळे वजनही वाढते. जर तुम्ही देखील शुगर फ्रीचा वापर करत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी जाणून घेऊया त्याबद्दल

1. टाइप 2 मधुमेहाचा धोका

वजन नियंत्रण करण्यासाठी तुम्ही शुगर फ्री औषध (Medicine) खाताय तर याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. याउलट, त्याचा जास्त वापर केल्याने टाइप २ मधुमेह, हृदयरोग किंवा पक्षाघाताचा धोका वाढू शकतो.

2. साखर नसलेल्या स्वीटनरमध्ये पोषक घटक नसतात

डब्ल्यूएचओच्या अहवालाने सांगितले आहे की, शुगर फ्रीमध्ये कोणतीही पोषक तत्व नाहीत. Acesulfame K, aspartame, avantame, cyclamates, neotame, saccharin, sucralose, stevia आणि stevia derivatives हे काही सामान्यतः वापरले जाणारे शुगर फ्री औषधे आहेत.

3. नॉन-शुगर स्वीटनर्सचे इतर तोटे

मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखरेचा हा एक वेगळा पर्याय आहे. यातून विशेष फायदा होणार नाही हे लक्षात ठेवा. परंतु याचा दीर्घकाळ वापर केल्याने मधुमेहासारखे चयापचय विकार आणि हृदयविकारांसारख्या गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो.

4. अन्नातील साखरेचे प्रमाण कसे कमी करावे

  • ब्रेड, सूप, कुरकुरीत पदार्थ नॉन-शुगर स्वीटनरच्या श्रेणीत ठेवले जातात. यात काही प्रमाणात साखर असते त्यामुळे याचे प्रमाण कमी करा.

  • पॅकेज केलेले अन्न घेण्यापूर्वी त्यातील साखरेची पातळी तपासा.

  • तुमच्या आहारात साखरमुक्त पदार्थांचा अधिक समावेश करा

  • साखरयुक्त पेयांऐवजी जास्त पाणी किंवा साखरमुक्त पेये प्या

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Kidney Health: आजच '१' पांढरा पदार्थ खाणं बंद करा; किडनी फेलचा धोका वाढतो.. तज्ज्ञ सांगतात...

Dhaba Style Chiken Curry: ढाबा स्टाईल चिकन करी घरी बनवण्याची सोपी पद्धत

Shegaon Crime : आठवडे बाजाराच्या गर्दीत गाठत युवकाची हत्या; खळबळजनक घटनेने शेगाव हादरले

Box Office Collection : 'थामा' की 'एक दीवाने की दीवानियत' वीकेंडला कोणता चित्रपट हाऊसफुल? वाचा कलेक्शन

SCROLL FOR NEXT