Jaundice Saam TV
लाईफस्टाईल

Kavil Symptoms: जीवघेणी ठरतेय पांढरी कावीळ, जाणून घ्या काय आहे कारण?

Pandhari Kavil Chi Lakshane: पावसाळा सुरू झाला की, सगळ्यांनाच भिजण्याचा मोह होतो. कुणी ट्रेकिंगला जातं तर कुणी मनसोक्त धबधब्यावर जाऊन निसर्गाचा आनंद घेत असतो. पण याच पावसाळ्यात अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

Jyoti Shinde

पावसाळ्यात कधी सर्दी, खोकला तर कधी ताप येत असतो याचबरोबर काही क्वचित लोकांना कावीळही होते, आता कावीळ म्हंटल की आपल्याला पिवळी कावीळच माहितेय. पण तुम्हांला माहितेय का ह्या पिवळ्या कावीळ व्यतिरिक्त पांढरी कावीळचा आणखी एक प्रकार आहे. ज्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाही, किंबहुना ती कशी ओळखायची असते हेच माहिती नसतं.या लेखाद्वारे आज आपण पांढरी कावीळ बद्दल जाणून घेणार आहोत. पांढरी कावीळ म्हणजे काय ? पांढऱ्या कावीळची लक्षणं कोणती ? ती कशी ओळखायची याबद्दल जाणून घेऊयात.

पांढरी कावीळला ' हिपॅटायटीस बी ' असं म्हणतात 'हिपॅटायटीस बी' हा मुख्यत्व करून यकृताचा रोग आहे. मानवी शरिरातील यकृत हे महत्त्वाचं कार्य करणार अवयव आहे. पिवळी कावीळ झाली की, डोळ्यातील पांढरा बाह्य भाग पिवळा होतो. लघवी गडद म्हणजेच हळद रंगाची होते. चेहऱ्यावरील त्वचा पीवळीसर रंगाची दिसून येते. पण सफेद कावीळने माणूस ग्रासित असला तरी मानवी शरीरावर एकही लक्षणं दिसून येत नाही.

'हिपॅटायटीस बी ' हे व्हायरस इन्फेक्शनमुळे होतं. 'हिपॅटायटीस बी 'चे विषाणू आपल्या शरीरात गेलं की त्याचं त्वरित परिणाम आपल्या डोळ्यांवर, चेहऱ्यावर, लघवीवर होत नाही , हा व्हायरस आपल्या शरीरात साधारणपणे 50 ते 180 दिवस राहू शकतो. म्हणजेच 6 महिने तोपर्यंत आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या व्हायरसशी लढा देत असते. त्यामुळे पांढऱ्या कावीळची कोणतीच लक्षणं दिसून येत नाही.

पांढरी कावीळचा प्रसार कसा होतो?

सफेद कावीळचा प्रसार HIV प्रमाणे असतो तो आजार नसून एक लक्षण आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला शारीरिक संबंधातून होऊ शकतो. दूषित रक्तामार्फत होऊ शकतो. त्याचबरोबर मातेकडून बाळाला होण्याची शक्यता आहे. हा व्हायरस आपल्या लिव्हरला डॅमेज करण्याचं कार्य करत असतो. यामुळे आपल्याला मळमळ होते, भूक लागत नाही, उलट्या होतात, सतत झोपून रहावस वाटतं. अचानक वजनात बदल जाणवतो.

वरील लक्षणांपैकी एखादं लक्षण जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन ' हिपॅटायटीस बी ' ची चाचणी करून घ्या. हा आजार घरगुती उपचाराने बरा होत नाही, त्यामुळे योग्य उपचाराकरिता डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT