
बेंगळुरूमध्ये भररस्त्यात महिला आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद
महिलेकडून पोलिसांना कपडे उतरवण्याची धमकी
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कर्नाटक पोलिसांकडून महिलेवर कायदेशीर कारवाई
'माझ्या स्टापला का हात लावला. त्याचा टी शर्ट का पकडला. 'मी तुझे कपडे उतरून तुला नग्न करीन' असा दम देत वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केलीय. भररस्त्यात पोलिसांसोबत वाद घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी महिलेला अटक केलीय. दरम्यान ही घटना बेंगरुळू मधील एका रस्त्यावर घडली होती. त्यानंतर पोलिसांनी महिलेवर कायदेशीर कारवाई केलीय.
पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांना 'ये, तू' असं उद्धटपणे बोलत दादागिरी करणाऱ्या महिलेचा पोलिसांनी माज उतरवला. अटक केल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियावर गुन्हा नोंदवल्याची प्रत शेअर केलीय. त्यासोबत महिला दादागिरी करत असल्याचा व्हिडिओदेखील पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. शुक्रवारी संध्याकाळी बेंगळुरू शहर पोलिसांनी एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ दोन भागात पोस्ट करण्यात आलाय.
पहिल्या भागात व्हायरल क्लिप दाखवली आहे, त्यात ती महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करताना दिसत आहे. तर दुसऱ्या भागात ती महिला कर्मचारी पोलीस कोठडीत असल्याचे दाखवण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी व्हिडिओसोबत गुन्हा नोंदवल्याची प्रतदेखील जोडली आहे. याचबरोबर पोलिसांनी वाहतूक पोलिसांवर दमदाटी करणाऱ्यांना शेलक्या शब्दात समज दिलीय.
पोलिसांनी व्हिडिओ पोस्ट करताना एक कॅप्शन दिले आहे: "पोलिसांवर ओरडून तुम्ही हिरो बनणार नाहीत. असभ्य शब्द आणि धमक्या तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी व्हीआयपी पास मिळवून देऊ शकतात. सावध रहा, पोलीस तुमच्यावर लक्ष ठेवून आहे." व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, गुलाबी टी शर्ट घातलेली महिला एका पुरुष आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ओरडताना दिसतेय.
अश्लील भाषा वापरत कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत आहे. दमदाटी करणारे महिला तिच्यासोबत असलेल्या एका पुरुषाचा बचाव करताना दिसत आहे. काळ्या टी शर्टमधील व्यक्ती तिच्या स्टाफ मेंबरने असल्याचं तिने सांगितले. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने तिच्या स्टापच्या व्यक्तीचा टी-शर्ट ओढल्याचा आरोप महिला करताना दिसतेय.
व्हिडिओमध्ये आपण ऐकू शकतो की, महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतेय. पुरुष कर्मचाऱ्याबरोबर महिला पोलीस कर्मचाऱ्याला देखील ती महिला धमकी देताना दिसतेय. महिला कर्मचाऱ्याला शिव्या देत आहे. तुझे कपडे उतरवून तुला नग्न करीन अशी धमकी ती महिला देताना दिसतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.