Natural Hair Dye Saam TV
लाईफस्टाईल

Natural Hair Dye : केस पांढरे झाल्याने टेन्शन आलंय? मग लोखंडी कढईत घरीच बनवा गावरान हेअर डाय

How to Get Black Hairs : केसांना डाय अप्लाय करत असताना आधी केसांचे व्यवस्थित सेक्शन करून घ्या. त्यानंतर फक्त केसांवर डाय अप्लाय करा.

Ruchika Jadhav

केस पांढरे होणं हा काही आजार नाही. वयानुसार आणि शरीरात विविध गोष्टींची, प्रोटीनची कमतरता असल्याने आपले केस पांढरे होतात. ही समस्या आता मोठ्याप्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक व्यक्तींना फार कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्या उद्भवतात. तरुण वयात केस पांढरे झाल्याने टेन्शन वाढतं. त्यामुळे काही व्यक्ती डिप्रेशनमध्ये देखील जातात.

केसांना पुन्हा नॅचरलपणे काळे करण्यासाठी व्यक्ती विविध डाय वापरतात. डायचा वापर केल्यानंतर केस अगदी ५ दिवसच काळे राहतात. नंतर हा रंग लगेचच निघून जातो. त्यामुळे वारंवार या डायचा वापर करावा लागतो. सतत डायचा वापर केल्याने काही दिवसांनी आपल्या स्कॅल्पवर त्याचा परिणाम होतो. काही व्यक्तींना यामुळे अंधत्व सुद्धा आलं आहे. त्यामुळे आज घरच्या घरी डाय बनवण्याच्या काही टिप्स पाहू.

साहित्य

१ कप पाणी

२ चमचे चहा पावडर

२० हार बनवताना वापरली जाणारी फुलं

१० हार बनवताना वापरात असलेली पानं

लोखंडाची कढई

१ कॉफीचे बारीक पाकीट

पाणी

कृती

सर्वात आधी कढईमध्ये पाणी घ्या. या पाण्यात चहा पावडर मिक्स करा. त्यानंतर चहा पावडर पाण्यात चांगली शिजवून घ्या. पुढे हे मिश्रण मिक्सरला अगदी पातळ वाटून घ्या. नंतर या भांड्यात फुलं आणि पानं सुद्धा भिजवून घ्या. तसेच याची देखील बारीक पेस्ट तयार करा. मिश्रण थंड करून घ्या आणि एका लोखंडी बाउलमध्ये दोन्ही मिश्रण काढून घ्या.

पुढे लोखंडी कढईत या मिश्रणावर कॉफीवापडर टाकून घ्या. कॉफी पावडर टाकल्यावर हे मिश्रण रात्रभर तसंच राहू द्या. रात्रीतून याला छान रंग येतो. त्यामुळे केस काळेभोर होण्यासाठी सुद्धा मोठी मदत होते.

केसांना डाय अप्लाय करत असताना आधी केसांचे व्यवस्थित सेक्शन करून घ्या. त्यानंतर फक्त केसांवर डाय अप्लाय करा. डाय स्कॅल्पला लागणार नाही याची योग्य काळजी घ्या. हा डाय तुम्ही ३ तासांनंतर पाण्याने धुवून घ्या. नंतर केस सुकवून घ्या आणि पुन्हा पाण्याने धुवून टाका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: त्वचेला बेसन लावल्यानंतर चुकूनही या गोष्टी लावू नका, नाहीतर...

Diabetes Control Tips: डायबिटीज होईल झटक्यात कमी, फक्त या ५ टिप्स करा न चुकता फॉलो

Nagar Parishad Nagar Panchayat Election: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा, कशाप्रकारे होणार मतदान प्रक्रिया, काय असतील नियम?

गुणकारी लवंग; ब्लड शुगर, ब्लड प्रेशर अशा अनेक समस्यांवरील रामबाण उपाय

Red Chilli Chutney Recipe: झणझणीत लाल मिरची चटणी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT