Best Low-Sugar Fruits for Diabetes google
लाईफस्टाईल

Diabetes Fruits Care: डायबेटीजच्या रुग्णांनी कोणती फळं खावीत? तज्ञांनी सांगितली यादी, एकदा वाचाच

Low Sugar Fuits: मधुमेहींनी कोणती फळे खावीत याबाबत अनेक गैरसमज आहेत. पीच, प्लम, कीवी, बेरीज आणि सफरचंद ही फळे कमी साखर आणि जास्त पोषक तत्त्वांमुळे डायबेटीस नियंत्रणात मदत करतात.

Sakshi Sunil Jadhav

  • सर्व फळांची साखर सारखी नसते. पीच, प्लम, कीवी, बेरीज आणि सफरचंद मधुमेहींसाठी सुरक्षित व फायदेशीर आहेत.

  • ही फळे कमी साखर, जास्त फायबर, व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तातील साखर स्थिर ठेवतात.

  • योग्य फळांची निवड केल्यास डायबेटीज असतानाही निरोगी आणि संतुलित आहार राखता येतो.

जेव्हा कोणत्याही व्यक्तीला डायबेटीज झाल्याचे कळते तेव्हा लगेचच त्याला साखर पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी तुमच्या लाइफस्टाईलमध्ये बदल करावे लागतात. त्यामध्ये अनेकांना वाटतं की फळं खाल्याने सुद्धा शुगर लेव्हल खूप वाढत असते. पुढे आपण याबद्दल सविस्तर अमेरिकन डॉक्टरांचे मत जाणून घेणार आहोत.

फळांनी ही फक्त रक्तामधील साखर नियंत्रित ठेवत नाहीत, तर शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सही पुरवतात. पीचेस हे अशाच सुपरफूड्सपैकी एक फळ आहे. यात व्हिटॅमिन A आणि C मुबलक प्रमाणात असते, जे दृष्टी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहे. एका कप पीचमध्ये सुमारे 13 ते 14 ग्रॅम साखर आढळते.

प्लम किंवा आलुबुखार हे फळ डायबेटीजसाठी योग्य मानले जाते. . एका कप प्लम्समध्ये सुमारे 16 ग्रॅम साखर असते. एका कप प्लम्समध्ये सुमारे 16 ग्रॅम साखर असते. दुसरीकडे, कीवी हे झिंगदार चवीचे फळ व्हिटॅमिन C, फायबर आणि पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे. एका कप कीवीमध्ये 13 ते 16 ग्रॅमपर्यंत साखर असते, जी रक्तातील साखरेत अचानक वाढ करत नाही.

ब्ल्यूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरीसारख्या बेरीज अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन C, K आणि फायबरने समृद्ध असतात. रास्पबेरीमध्ये तर फक्त 5 ते 6 ग्रॅम साखर असते. लिंबूवर्गीय फळे म्हणजेच सिट्रस फळांमध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात आढळते. ही फळे दाह कमी करण्यास मदत करतात. लिंबामध्ये एका कपात सुमारे 5 ग्रॅम तर मँडरिनमध्ये 20 ग्रॅमपेक्षा जास्त साखर असू शकते.

सफरचंदातील फायबर आणि व्हिटॅमिन C मधुमेहींसाठी विशेषतः फायदेशीर आहेत. सफरचंदाची साल काढू नये, कारण त्यातच बहुतेक पोषणमूल्य आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. एका कप सफरचंदात सुमारे 13 ग्रॅम साखर असते. ही सर्व फळे रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतात आणि एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. मधुमेह असला तरी योग्य आहार निवडून निरोगी जीवन जगणे शक्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर… पण एक लहान चूक तुमचा 3000 चा लाभ थांबवू शकते, पाहा VIDEO

Mumbai- Delhi Expressway: ६ राज्य, १३५५ किमीचा मार्ग; २५ तासांचा प्रवास फक्त साडेबारा तासांवर; मुंबई- दिल्ली एक्स्प्रेस वे कधी सुरू होणार?

Maharashtra Live News Update : पुण्यातील रमेश डाईंग दुकानाला लागलेली आग आटोक्यात, कुठलीही जीवितहानी नाही

8th Pay Commission: १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Bigg Boss 19: लाल ड्रेसचा शाप की निर्मात्यांचा निर्णय? फरहाना हरल्याने नेटकऱ्यांमध्ये रंगला नवा वाद

SCROLL FOR NEXT