Which Summer Drink Is Best Saam Tv
लाईफस्टाईल

Which Summer Drink Is Best : उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय असेल बेस्ट ! ताक, लस्सी की दही ?

Summer Drinks to Beat the Heat: मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने आपल्याला पोटात आग पडते किंवा पोट बिघडते.

कोमल दामुद्रे

Buttermilk, Lassi And Curd Benefits: वाढत्या उन्हाळ्यात शरीराला अधिक थंडाव्याची गरज असते. मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने आपल्याला पोटात आग पडते किंवा पोट बिघडते. अशावेळी दही, लस्सी किंवा ताकाचे सेवन करतो.

परंतु, आपल्या घरातील वयस्कर मंडळी आपल्याला रात्रीच्या वेळी दह्याचे पदार्थांचे (Food) सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु वाढत्या उकाड्यात नेमके करायचे काय हा प्रश्न सगळ्यांना पडतो. उन्हाळ्यात आपण सर्वजण पोटाला (Stomach) थंडावा देण्यासाठी, छातीत जळजळ कमी करण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पेये घेतो. काही थंड पेय पितात, तर काही शीतपेये पितात.

त्याचबरोबर उन्हाळ्यात फळांचा रस, नारळ पाणी किंवा लिंबू पाणी पिणारे अनेक जण आहेत. याशिवाय काही लोक उन्हाळ्यात ताक (Buttermilk), लस्सी, दही यांचे सेवन करतात. ताक, लस्सी आणि दही या तिन्ही पदार्थांमध्ये भरपूर पोषक असतात.

यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे या तिघांचाही आहारात समावेश करण्याची शिफारस आरोग्यतज्ज्ञ करतात. दह्याचे सर्व ऋतूंमध्ये लोक सेवन करतात. पण ताक आणि लस्सी हे मुख्यतः उन्हाळ्यात प्यायले जाणारे पेय आहे. अशा परिस्थितीत बहुतांश लोकांच्या मनात प्रश्न पडतो की उन्हाळ्यात ताक, लस्सी किंवा दही कोणते पिणे जास्त फायदेशीर आहे?

1. ताक, लस्सी किंवा दही कोणते उन्हाळ्यासाठी अधिक फायदेशीर आहे?

उन्हाळ्यात दह्यापेक्षा ताक आणि लस्सी पिणे जास्त फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तर ताक पिणे अधिक फायदेशीर आहे. ताकामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच ताक प्यायल्याने पचनक्रियाही चांगली होते. ताकामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो.

लस्सी आणि दह्यापेक्षा ताक पचायला सोपे असते. हे सर्व प्रकारच्या शरीरासाठी देखील फायदेशीर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात निरोगी, तंदुरुस्त आणि हायड्रेटेड राहण्यासाठी ताकाचे जास्त प्रमाणात सेवन करावे. लोणीतून निघणारे ताक तुम्ही पिऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही उन्हाळ्यात लस्सीही पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरालाही थंडावा मिळेल. पण उन्हाळ्यात दही सेवन करू नये.

2. दह्यापेक्षा ताक आणि लस्सी का उत्तम?

  • दही पचायला जड आहे. उन्हाळ्यात पचनशक्ती कमजोर असते, त्यामुळे दही पचायला खूप वेळ लागतो. म्हणूनच उन्हाळ्यात दही न खाण्याचा सल्ला दिला जातो.

  • ताक पचायला सोपे असते कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. ताकही भूक वाढवण्यास मदत करते.

  • उन्हाळ्यात अ‍ॅसिडीटी आणि पोटात उष्णतेचा त्रास होतो. ताक प्यायल्यानेही या समस्यांपासून सुटका मिळते.

  • वजन कमी करायचे असले तरी उन्हाळ्यात ताक सेवन करू शकता. ताकासाठी दही कमी आणि पाणी जास्त घ्या.

  • ताक आणि लस्सीचा थंड प्रभाव असतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात ताक आणि लस्सी प्यायल्यास शरीराचे तापमान संतुलित राहते.

  • ताक आणि लस्सीमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने असतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT