Vastu Tips CLOCK saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : तुमच्या घरातील घड्याळ कोणत्या दिशेला आहे? चुकीच्या दिशेला असेल तर बसेल आर्थिक फटका

Vastu Tips : वास्तू शास्त्रानुसार, आपल्या घरासाठी तसंच घरातील काही गोष्टींसाठी खास नियम ठरवून देण्यात आले आहेत. जर घड्याळ योग्य दिशेला नसेल तर वास्तू दोषाचा सामना करावा लागू शकतो.

Surabhi Jagdish

ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे आपण वास्तू शास्त्राला देखील महत्त्व देतो. घरात कायम आनंद, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहावं म्हणून आपल्यापैकी अनेकजण वास्तू शास्त्राची मदत घेतात. वास्तू शास्त्रानुसार, आपल्या घरासाठी तसंच घरातील काही गोष्टींसाठी खास नियम ठरवून देण्यात आले आहेत. या नियमांनुसार घरातील गोष्टींची मांडणी केली तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते असं म्हटलं जातं.

घड्याळाबाबत वास्तू शास्त्राचा नियम काय सांगतो?

वास्तूशास्त्रानुसार, तुम्ही घरात लावत असलेलं घड्याळ योग्य दिशेला असणं गरजेचं आहे. जर घड्याळ योग्य दिशेला नसेल तर वास्तू दोषाचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी तुम्हाला आर्थिक किंवा मानसिक आरोग्याचा सामना करावा लागू शकतो. योग्य दिशेला जर घड्याळ लावलं तर घरातील व्यक्तींना लाभ होऊ शकतो. जाणून घेऊया कोणत्या दिशेला असावं घरातील घड्याळ.

पूर्व आणि उत्तर दिशा

वास्तू शास्त्रानुसार, घरातील पूर्व दिशेला घड्याळ लावणं शुभ मानलं जातं. याशिवाय उत्तर दिशेला लावण्यात येणारं घड्याळ घरातील व्यक्तींना शुभ फळ देतात. यावेळी तुमच्या कुटुंबामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहे.

कोणत्या दिशेला असू नये घरातील घड्याळ

घरातील पश्चिम दिशेला घड्याळ लावू नये. वास्तू शास्त्रानुसार, यामुळे तुमच्या आयुष्यात कठीण काळ येण्याचा धोका असतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी यावेळी प्रचंड त्रास होऊ शकतो.

दरवाज्यावर लावू नका घड्याळ

वास्तू शास्त्र असंही सांगतं की, तुमच्या घरी असलेल्या कोणत्याही दरवाज्याच्या वर घड्याळ लावू नये. असं करणं शुभ मानलं जात नाही. यावेळी तुमच्या घरात दारिद्र येण्याचा धोका असतो.

बंद किंवा तुटलेलं घड्याळ ठेऊ नये

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये असलेलं घड्याळ कधीही बंद ठेवू नका. शिवाय घड्याळ वेळेनुसार ठेवावं. ५-१० मिनिटं पुढे मागे ठेऊ नये. याशिवाय तुटलेलं घड्याळ घरात कधीही ठेवू नये. असं घड्याळ घरात ठेवल्याने घरातील वातावरण बिघडू शकतं. तुटलेलं घड्याळ हे गरीबीचं लक्षणं मानलं जातं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडणून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

Prajakta Mali : 'फुलवंती'ची OTT वर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; चक्क हॉलिवूडला टाकलं मागे, प्राजक्ता माळीने चाहत्यांचे मानले आभार

Maharashtra Exit Poll: संगरनेरमध्ये बाळासाहेब थोरात होणार आमदार? VIDEO

Maharashtra Exit Poll: चोपडा मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT