Cancer Prevention Vaccine saam tv
लाईफस्टाईल

Cancer vaccine: रशियाची लस नेमक्या कोणत्या कॅन्सरवर करणार उपचार? पाहा तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Cancer Prevention Vaccine: कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर उपाय म्हणून रशियाने मोठी घोषणा केलीये. रशियाने कॅन्सरची लस तयार केली असून रशियाच्या म्हणण्याप्रमाणे ही लस सर्व नागरिकांना मोफत उपलब्ध होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

केवळ भारत नाही तर संपूर्ण जगभरात कॅन्सरच्या रूग्णांची वाढ होतेय. याशिवाय कॅन्सरवर उपचार करायचे म्हटलं तरी ते परवडण्याजोगे नाहीत. अशातच आता एक चांगली बातमी समोर आली आहे. या जीवघेण्या आजारावर उपाय म्हणून रशियाने मोठी घोषणा केलीये. रशियाने कॅन्सरची लस तयार केली असून रशियाच्या म्हणण्याप्रमाणे ही लस सर्व नागरिकांना मोफत उपलब्ध होणार आहे. ही लस कोणत्या कॅन्सरवर उपचार करणार ते पाहूयात.

रशियाच्या तज्ज्ञांनी काय सांगितलं?

आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख आंद्रे कॅप्रिन यांनी सांगितले की, राज्य माध्यमांनुसार शॉट 2025 च्या सुरुवातीला सुरू होणार आहे. अहवालानुसार, रशियाने कॅन्सरविरूद्ध स्वतःची mRNA लस विकसित केली आहे.

कधी होणार लस लाँच?

रशिया सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ही लस कॅन्सरविरूद्ध लढा देण्यासाठी लस विकसित केली आहे. ही 2025 च्या सुरुवातीपासून रशियामधील कॅन्सरच्या रूग्णांना विनामूल्य दिली जाणार आहे. रशियन सरकारी वृत्तसंस्था TASS नुसार, रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी एका रशियन रेडिओ चॅनेलवर या लसीबद्दल माहिती दिली.

कोणत्या कॅन्सरवर उपचार करणार ही लस?

ही लस कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणार आहे. रशियन सरकारी शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की, प्रत्येक शॉट एका वैयक्तिक रुग्णासाठी रजिस्टर आहे. दरम्यान कोणत्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी ही लस तयार केली गेली आहे, ती किती प्रभावी आहे किंवा रशियाने ती कशी लागू करण्याची योजना आखली आहे हे सध्या अस्पष्ट आहे. या लसीचे नाव समोर आलेलं नाही.

मुंबईतील सिनियर ऑन्कोलॉजीस्ट डॉ. संजय दुधाट यांनी सामशी बोलताना सांगितलं की, या लसीबाबत अजून पुरेशी माहिती हाती आली नाहीये. याबाबत केलेल्या संशोधनाचा योग्य अभ्यास करून ही लस किती प्रभावी ठरेल हे सांगता येऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Ujjawala Yojana: पीएम उज्जवला योजनेत मिळतात मोफत गॅस सिलेंडर; आवश्यक कागदपत्रे आणि अर्जप्रक्रिया घ्या जाणून

Malaika Arora : मलायका अरोरा झाली मालामाल; विकलं मुंबईतील आलिशान अपार्टमेंट, नफा वाचून बसेल धक्का

Maharashtra Live News Update: आरक्षणासंदर्भात ओबीसी समाजाचे नेते आणि वकील महासंघाची महत्वाची बैठक

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT