Washing Machine Vastu saam tv
लाईफस्टाईल

Washing Machine Vastu: घरात वॉशिंग मशीन कुठे ठेवताय? योग्य दिशा माहिती नाही? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

Washing Machine Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात वॉशिंग मशीन कोणत्या दिशेला ठेवावी? ईस्ट साऊथ ईस्ट आणि वेस्ट नॉर्थ वेस्ट दिशा योग्य मानल्या जातात. जाणून घ्या वॉशिंग मशीनसाठी शुभ रंग, टाळावयाच्या दिशा आणि घरातील सकारात्मक ऊर्जेसाठी महत्त्वाच्या वास्तु टिप्स.

Surabhi Jayashree Jagdish

घरात वॉशिंग मशीन कुठे ठेवावी, याचा विचार आपण फारसा करत नाही. पण वास्तुशास्त्रानुसार वॉशिंग मशीन ठेवण्याची दिशाही महत्त्वाची मानली जाते. चुकीच्या दिशेला मशीन ठेवल्यास घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे घरात वॉशिंग मशीन ठेवताना योग्य दिशा कोणती, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

वास्तुशास्त्रानुसार, वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी ईस्ट साऊथ ईस्ट आणि वेस्ट नॉर्थ वेस्ट या दोन दिशा सर्वात योग्य मानल्या जातात. कपडे स्वच्छ करणाऱ्या वॉशिंग मशीनमुळे या दिशांमधील ऊर्जेवर चांगला परिणाम होतो, असं मानलं जातं. त्यामुळे घरातील वॉशिंग एरिया या दोन दिशांना असेल तर ते फायदेशीर ठरू शकतं.

नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी कोणती दिशा योग्य?

वास्तुशास्त्रानुसार, ईस्ट साऊथ ईस्ट ही दिशा ऊर्जा वाढवणारी आणि विचारांना चालना देणारी मानली जातं. त्यामुळे कपड्यांवरील मळ आणि घाण काढणारी वॉशिंग मशीन या दिशेला ठेवणं योग्य मानलं जातं. तर वेस्ट नॉर्थ वेस्ट ही दिशा कोरडेपणा आणि मनातील निराशा याच्याशी जोडली जाते. या दिशेला वॉशिंग मशीन ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं.

'या' दिशांना वॉशिंग मशीन ठेवणं टाळा

नॉर्थ वेस्ट आणि साऊथ साऊथ वेस्ट या दिशांनाही वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी पर्याय मानलं जातं. पण साऊथ साऊथ वेस्ट दिशेला मशीन ठेवल्यास ती वारंवार खराब होऊ शकते. त्याचप्रमाणे दुरुस्तीचा खर्चही वाढू शकतो, असं मानलं जातं.

घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच नॉर्थ ईस्टला वॉशिंग मशीन ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं. या दिशेला मशीन ठेवल्यास आयुष्यात मिळणाऱ्या संधी कमी होऊ शकतात, असं वास्तुशास्त्र सांगतं. यामुळे मनःशांती बिघडू शकते. याशिवाय विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊन मनात नकारात्मक विचार वाढू शकतात.

दुसरीकडे दक्षिण-पूर्व म्हणजेच साऊथ ईस्ट दिशेला वॉशिंग मशीन ठेवल्यास घरातील उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोजचा घरखर्च भागवताना अडचणी येऊ शकतात, अशी मान्यता आहे.

वॉशिंग मशीनसाठी कोणते रंग शुभ मानले जातात?

वॉशिंग मशीन ठेवण्याच्या दिशेबरोबरच तिचा रंगही महत्त्वाचा मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार, ईस्ट साऊथ ईस्ट दिशेला ठेवलेल्या वॉशिंग मशीनसाठी हिरवा, लाल, गुलाबी, नारंगी, ऑफ व्हाइट, तपकिरी आणि पिवळा हे रंग शुभ मानले जातात. तर वेस्ट नॉर्थ वेस्ट दिशेला मशीन ठेवली असल्यास पिवळा, पांढरा, निळा आणि काळा हे रंग योग्य मानले जातात.

तुमच्या घरातील वॉशिंग मशीनचा रंग या दिशेनुसार नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. मशीनला त्या दिशेसाठी योग्य मानल्या जाणाऱ्या रंगाच्या कापडाने झाकून ठेवू शकता.

वास्तुशास्त्रानुसार, एखादी वस्तू एकाच ठिकाणी किमान ४५ दिवस ठेवल्यानंतर तिचा वास्तुशी संबंधित परिणाम दिसू लागतो, असं मानलं जातं. हा परिणाम चांगला असो किंवा वाईट त्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी महत्त्वाचा मानला जातो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Tyre Pressure: बाइकच्या पुढच्या टायरमध्ये किती PSI हवा असावी? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबईत उघड्यावर शेकोटी पेटवल्यास २ हजार दंड

पोहे बनवताना लिंबू कधी टाकावा?

Mumbai : मुंबईत उघड्यावर शेकोटी पेटवणे महागात पडणार! इतक्या रुपयांचा आकारणार दंड; प्रशासनाचा निर्णय

Panvel Badlapur Tunnel : बदलापूर ते पनवेल अवघ्या २० मिनिटांत, बोगद्याचं काम पूर्ण; कधीपासून धावणार गाड्या?

SCROLL FOR NEXT