Bike Tyre Pressure: बाइकच्या पुढच्या टायरमध्ये किती PSI हवा असावी? जाणून घ्या

Surabhi Jayashree Jagdish

टायरमध्ये हवा

टायरमध्ये हवा कमी असल्यास बाइक चालवताना टायर रस्त्यावर जास्त दाबला जातो. यामुळे बाइक चालवताना पेट्रोल जास्त खर्च होऊ शकते. तसंच टायर लवकर गरम होऊन खराब होण्याची शक्यता वाढते.

जास्त हवा भरल्यास नुकसान

टायरमध्ये गरजेपेक्षा जास्त हवा भरल्यास टायरचा रस्त्याशी संपर्क कमी होऊ शकतो. त्यामुळे खड्डे किंवा खराब रस्त्यावर बाइक चालवताना जास्त धक्के जाणवतात. टायरच्या मधल्या भागाची झीज लवकर होण्याची शक्यता असते.

हवा किती दिवसांनी तपासावी?

बाइकच्या टायरमधील हवा किमान 15 दिवसांतून एकदा तपासावी. लांबचा प्रवास करणार असाल तर प्रवास सुरू करण्यापूर्वी हवेचा दाब तपासून घ्यावा. शक्यतो टायर थंड असताना हवा तपासावी कारण बाइक चालवल्यानंतर टायरमधील हवेचा दाब वाढतो.

पुढच्या आणि मागच्या टायरची हवा वेगवेगळी असते का?

होय, बाइकच्या पुढच्या आणि मागच्या टायरमध्ये हवेचं प्रमाण वेगवेगळे असू शकतं. मागच्या टायरवर रायडरसोबत बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा आणि सामानाचा भारही येतो. त्यामुळे अनेक बाइकच्या मागच्या टायरमध्ये पुढच्या टायरपेक्षा जास्त PSI हवा ठेवण्यास सांगितलं जातं.

योग्य हवा किती PSI आहे, हे कसं ओळखावं?

बाइकच्या टायरमध्ये किती हवा असावी हे त्या बाइकच्या मॉडेलवर अवलंबून असतं. याची योग्य माहिती बाइकच्या मालकाच्या मॅन्युअलमध्ये दिलेली असत. काही बाइकच्या चेन कव्हरजवळ किंवा स्विंगआर्मवरही टायरमधील हवेच्या दाबाची माहिती दिलेली असते.

बाइकच्या टायरमध्ये हवा भरताना कोणत्या चुका टाळाव्यात?

टायरमध्ये अंदाजाने हवा भरू नये तर PSI गेजच्या मदतीने दाब तपासावा. टायर गरम असताना हवा कमी करू नये, कारण त्यामुळे चुकीचं प्रमाण मिळू शकतं. टायरमध्ये गरजेपेक्षा जास्त किंवा कमी हवा भरली जाणार नाही याची काळजी घ्यावी.

पुढच्या टायरमध्ये किती PSI हवा असावी?

बाइकच्या पुढच्या टायरमध्ये किती PSI हवा असावी हे बाइकच्या कंपनीनुसार आणि मॉडेलनुसार बदलतं. अनेक सामान्य कम्युटर बाइक्समध्ये पुढच्या टायरसाठी साधारण 25 ते 29 PSI हवा दिली जाते. पण तुमच्या बाइकसाठी नेमकं किती PSI योग्य आहे हे मॅन्युअलनुसार किंवा कंपनीने दिलेल्या स्टिकरवरून तपासावं.

Bike chain maintenance: बाईकची चेन किती दिवसांनी ल्युब्रिकेट करावी?

Bike chain maintenance | saa tv
येथे क्लिक करा