Nirmala Sitharaman Google
लाईफस्टाईल

Nirmala Sitharaman: निर्मला सितारामन यांच्या साडीचे 'हे' वैशिष्ट्य ९९% लोकांना माहीत नाही? जाणून घ्या खासियत

Madhubani Painting Sarees:आज आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यांची सगळ्यात मोठी बाब म्हणजे त्या सर्वाधिक काळ अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री ठरल्या आहेत.

Saam Tv

आज आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यांची सगळ्यात मोठी बाब म्हणजे त्या सर्वाधिक काळ अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. आज ११ वाजता अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात झाली आहे. या आधी निर्मला सितारामन यांचे बजेट टीमसह एक खास फोटो सेशन झाले. त्यात त्यांच्या साडीवर अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या. गेल्या ७ अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारामन यांनी नेसलेली साडी आकर्षक राहिली होती. तसेच या वेळी सुद्धा त्यांनी एक विशेष प्रकारची साडी परिधान केली आहे.

त्या पारंपारिक साडीचा रंग हा क्रीम कलर म्हणजेच 'मधुबनी मोटिफ' आहे. तसेच या साडीचे विशेष आकर्षण म्हणजे त्यांच्या साडीवर असलेली डिजाईन. या साडीवर झगमगाट नसुन एक सुंदर पेंटिग करण्यात आली आहे. या पेंटिगला मिथिला पेटिंग म्हणतात. ही साडी त्यांनी डार्क लाल कलरच्या ब्लाउजसह परिधान केली आहे. त्यामुळे अर्थमंत्री सगळ्यात उठून दिसत आहेत. इतकेच नाही तर त्यांनी हातात सोन्याच्या बांगड्या, गळ्यात चेन आणि कानातले सुद्धा परिधान केले आहेत.

अर्थमंत्र्यांची साडी कोणी डिझाईन केली?

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची साडी मधुबनी दिसायला साधी आणि आकर्षक आहे. ही साडी मधुबनी पेंटिंग असलेली आहे. त्यांना ही साडी सौराठ मिथिला पेंटिंग इंस्टीट्यूटमध्ये मिळाली होती. तसेच दुलारी देवी यांनी ही साडी त्यांना गिफ्ट केली होती. अशी माहिती जनता दल युनायटेडचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी दिली आहे. दुलारी देवी यांना २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मधुबनी पेंटिंगची खासियत काय?

मधुबनी पेंटिंग, ज्याला मिथिला पेंटिंग म्हणून सुद्धा ओळखले जाते. ही बिहारची मिथिला प्रदेशातील एक प्रमुख पारंपारिक कला आहे. ही पेंटिंग प्रामुख्याने महिला वर्ग करतात. त्यात नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला आहे. ही कला भारत आणि नेपाळमध्ये प्रचलित असलेली चित्रकला शैली आहे. हे नाव बिहार, भारतातील मधुबनी जिल्ह्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. यात वापरले जाणारे रंग नैसर्गिक असतात. यात तपकिरी लालसर आणि काळा रंग देण्यासाठी नैसर्गिक गेरू आणि लॅम्पब्लॅक सारख्या रंगद्रव्यांचा वापर करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT