Diwali 2025 google
लाईफस्टाईल

Diwali 2025: यंदा दिवाळी कधी आहे? जाणून घ्या धनतेरस, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्थी आणि भाऊबीजच्या तारखा

Bhaubeej 2025: यंदाची दिवाळी २० ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी होणार आहे. धनतेरस, वसुबारस, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजच्या अचूक तारखा जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

भारतात दिवाळी हा सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. तसेच परदेशातही हिंदूही हा सण मोठ्या धामधुमीत साजरा करतात. हा सण सगळ्यांसाठीच धामधुमीचा आणि समृद्धीचा सण मानला जातो. पुढे आपण यंदा दिवाळी किती तारखेला आहे? त्याचसोबत धनतेरस, भाऊबीज, वसुबारस, नरक चतुर्थी, लक्ष्मी पूजन किती तारखेला आहे? यासगळ्यांच्या तारखा आपण जाणून घेणार आहोत. कारण अनेक जणांचा गोंधळ उडालेला असतो की, दिवाळी २० ऑक्टोबरला आहे २१ ऑक्टोबरला? जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

दिवाळी हा साधारणत: पाच दिवसांचा सण असतो. यामध्ये इतर सण येतात. दिवाळी हा सण मोठ्या संख्येने साजरा करतात. त्यामध्ये दारासमोर मोठ मोठ्या रांगोळ्या, घरात फराळ, नवे कपडे दिवाळीतले कंदील आणि दिवे या सगळ्याचा समावेश असतो. पुढे आपण हिंदू कॅलेंडरनुसार हा सण किती तारखेला असणार आहे हे जाणून घेऊयात.

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी सुरु होतो. यंदा दिवाळी २० ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी अमावस्येला सुरुवात होणार आहे. याची तारिख ३.४४ वाजता सुरु होऊन २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.५४ वाजता समाप्त होणार आहे.

वसुबारस

वसुबारस हा सण १७ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी गो मातेची म्हणजेच गाईची पूजा केली जाते. हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो.

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी येत्या १८ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा करता येणार आहे. यादिवशी लक्ष्मी, खरेदी आणि पैशांचे देव कुबेराची पूजा केली जाते.

दीपदान

दीपदान हा सण १९ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे.

नरक चतुर्थी

२० ऑक्टोबरला नरक चतुर्थी सोमवारी साजरा केला जाणार आहे. यालाच छोटी दिवाळी किंवा रुप चौदस असेही म्हणतात.

लक्ष्मीपूजन

२१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन असणार आहे. तर २२ ऑक्टोबरला दीपावली पाडवा साजरा केला जाईल. शेवटी भाऊबीज हा सण २३ ऑक्टोबरला साजरा करुन दिवाळीचा शेवट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UK Politics: मुस्लीम महिला होणार ब्रिटनची PM; कोणाचं नाव आहे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत?

एक मत गेमचेंजर ठरलं; ठाकरेंच्या शिलेदाराचं नशीब उजळलं, भाजपचं गणित बिघडलं

EPFO कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाय; नव्या अ‍ॅपद्वारे निघेल पीएफचा पैसा

Tuesday Horoscope : संपत्तीमध्ये वाढ होईल, दिवसभर आनंदी राहाल; ५ राशींच्या लोकांसाठी मंगळवार गेमचेंजर ठरणार

कारमध्ये डिझेल भरताना अनर्थ घडला; तरण्याताठ्या मुलाचा Heart Attackनं मृत्यू

SCROLL FOR NEXT