लाईफस्टाईल

Breast growth stages: स्तनांची वाढ नेमकी कधी थांबते?; प्रत्येक महिलेला माहिती असायलाच हवं, जाणून घ्या तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Breast Growth Stop Expert Women Know: महिलांच्या शरीरातील बदलांमध्ये स्तन विकास हा महत्त्वाचा टप्पा आहे. अनेकांना प्रश्न पडतो की स्तन वाढ नेमकी कधी थांबते? तज्ञांच्या मते, स्तन विकासाची प्रक्रिया किशोरावस्थेत सुरू होते आणि काही वर्षांनंतर स्थिरावते.

Surabhi Jayashree Jagdish

महिलांना अनेकदा प्रश्न पडतो की, स्तनांची वाढ नेमकी कोणत्या वयापर्यंत होतो. मासिक पाळीमध्ये स्तनांमध्ये होणार बदल सामान्य असतात. अनेक महिलांना असं वाटतं की, पौगंडावस्थेनंतर स्तनांमध्ये बदल होणं किंवा त्यांची वाढ होण्याची प्रक्रिया थांबते. आज या आर्टिकलच्या माध्यमातून वैज्ञानिकदृष्ट्या स्तनांमध्ये होणारे बदल कधी थांबतात हे जाणून घेऊया.

स्तनांची वाढ किंवा त्यामध्ये होणारा बदल हा थेलार्के (Thelarche) नावाच्या प्रक्रियेचा भाग आहे. महिलांमध्ये पौगंडावस्थेचं पहिलं शरीरावर दिसून येणारं हे लक्षणं मानलं जातं. वयात्या ८ ते १३ व्या वर्षांच्या मुलींमध्ये ही प्रक्रिया सुरु होते. यामध्ये प्रामुख्याने शरीरात इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतं.

ओनली माय हेल्थ बेवसाईटला माहिती देताना Ferty9 Fertility Centre च्या IVF स्पेशालिस्ट डॉ. सुमा वर्षा यांनी स्तनांमध्ये बदल होणाऱ्या प्रक्रियेचे काही टप्पे सांगितले आहेत.

टप्पा १

स्तनांमध्ये टिश्यू नसून छाती सपाट असते.

टप्पा २

स्तनाग्राखाली लहान गाठी तयार होतात. हा बदल साधारणपणे ९–११ वयातमध्ये दिसून येतो.

टप्पा ३ आणि ४

यावेळी स्तनांचा आकार वाढू लागतो. एरिओला गडद होऊ लागतं.

टप्पा ५

स्तनांचं प्रौढ आकारमान साधारण १७–१८ वयात प्राप्त होतं.

स्तनांमध्ये होणारा बदल कधी थांबतो?

बहुतेक स्त्रियांमध्ये स्तनांचा विकास १७ ते २१ वयात पूर्ण होतो. मात्र याचा अर्थ असा नाही की त्याच्या आकारात बदल होणार नाही. किशोरावस्थेनंतरही काही घटकांमुळे स्तनांचा आकार वाढू किंवा कमी होऊ शकतो

हार्मोनल बदल

मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती यामुळे हार्मोनल बदल होतात. ज्याचा परिणाम स्तनांच्या पेशींवर होतो. गर्भधारणेदरम्यान milk ducts आणि चरबीच्या पेशी वाढतात. ज्यामुळे स्तनांचा आकार मोठा होतो.

वजन वाढ

स्तन हे चरबीच्या पेशींनी बनलेलं असल्याने वजन वाढल्यास त्यांच्या आकारात देखील बदल होतो. तर वजन कमी झाल्यास त्यांचा आकारही बदलतो.

गर्भनिरोधक गोळ्या

काही गर्भनिरोधक गोळ्यांमुळे इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. अशावेळी आणि काही वेळापुरती स्तनांचा सूज येऊ शकते.

जेनेटीक्स

काही वेळा स्तनांचा आकार वाढणं किंवा त्यांची वाढ थांबणं या गोष्टी जेनेटीक्सवर अवलंबून असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळे येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

बापरे! महिला पोलीस हवालदारानं मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोकळा आणला, पाहुणे-राहुणे खाणार तेवढ्यात...

Raigad Politics: शिंदे गटाला मोठा धक्का; शिवसेनेचे ७ नगरसेवक अपात्र, काय आहे कारण?

वर्दीपलीकडचं नातं! पोलीस भावाने यकृतदान करून धाकट्या भावाला दिलं नवजीवन

Crime News: ट्रॅव्हल्स अडवून काँग्रेसच्या नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी; समृध्दी महामार्गावरील घटना

SCROLL FOR NEXT