Best Food For Eyes  Saam Tv
लाईफस्टाईल

Best Food For Eyes : डोळ्यांनी धूसर दिसते ? चश्मा देखील लागलाय ? आहारात या पदार्थांचा समावेश जरुर करा

कोमल दामुद्रे

Eye Care Tips : हल्ली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण मोबाइल स्क्रीनचा अतिवापर करतो. चालताना प्रवास करताना किंवा रिकाम्या वेळी जणू तो आपला सवगंडीच आहे असे प्रत्येकाला वाटू लागते.

लॅपटॉप व फोनवर बराच वेळ घालवण्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर पडतो. काम करताना डोळे धूसर होऊ लागले तर समजून घ्या की डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यासाठी योग्य आणि संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. संतुलित आहार डोळ्यांची स्थिती सुधारण्यास मदत करतो.

काही वेळा पौष्टिक पदार्थ न खाल्ल्याने डोळे (Eyes) कोरडे पडणे, कमी दिसू लागणे, मोतीबिंदू यांसारख्या समस्या निर्माण होतात. अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स तुमच्या डोळ्यांसाठी आवश्यक आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल

1. व्हिटॅमिन-अ

चांगल्या दृष्टीसाठी व्हिटॅमिन (Vitamins)-अ महत्वाचे आहे. त्यासाठी आहारात धणे, गाजर, मेथी, पालक ज्यूस तसेच अंड्यातील पिवळ बलक, मटण, लाल आणि पिवळ्या फळांचा समावेस करायला हवा. तसेच रताळे, आंबा, पपई, भोपळा, चीज, चेरी, टरबूज इत्यादी व्हिटॅमिन-ए चे चांगले स्रोत आहेत. चांगल्या आणि तीक्ष्ण दृष्टीसाठी या गोष्टींचा आहारात समावेश केलाच पाहिजे.

2. व्हिटॅमिन-ई

व्हिटॅमिन-ई शरीरातील ऑक्सिडेशन चांगले करते. याचा अर्थ शरीरात फ्री रॅडिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्सचे असंतुलन असते, ज्यामुळे पेशींचे नुकसान होते. यामुळेच हे डोळ्यांसाठीही चांगले मानले जाते. डोळ्याच्या लेन्समधील ऑक्सिडेशनमुळे मोतीबिंदू तयार होतो असे मानले जाते. बहुतेक सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे होते. यासाठी आहारात भरपूर ड्रायफ्रूट्स खावेत. बदाम (Almond), अक्रोड, शेंगदाणे आणि काजू यांसारखे नट तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. याव्यतिरिक्त, पालक, शतावरी आणि तीळ यांचे सेवन करणे चांगले होईल.

3. जीवनसत्व- B2

डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे आणखी एक जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन बी 2 किंवा रिबोफ्लेविन. हे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करते आणि डोळ्यांच्या सर्व समस्या दूर करते. हे जीवनसत्व मिळवण्यासाठी तुमच्या आहारात बदाम, अल्फाल्फा स्प्राउट्स, सोयाबीन, तीळ, मसूर, पालक आणि ब्रोकोली यांचा समावेश करा.

4. कॅल्शियम

चीज, दूध, दही, चणे, राजमा, सोयाबीन, बदाम, अंडी, अक्रोड, ओट्स, ज्वारी इत्यादी सर्व गोष्टी कॅल्शियमचे चांगले स्रोत मानले जातात. कॅल्शियम फक्त तुमची हाडे मजबूत ठेवत नाही तर ते तुमच्या दृष्टी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाचे आहे.

5. या टिप्स देखील लक्षात ठेवा-

  • तुमचा आहार संतुलित करण्यासोबतच अशा अनेक सवयी आहेत ज्या बदलायला हव्यात.

  • आपली खराब जीवनशैली, कॉम्प्युटर आणि फोनमध्ये जास्त वेळ घालवल्याने डोळ्यांवरही फरक पडतो, त्यामुळे आहारासोबत या गोष्टींकडेही लक्ष द्या.

  • नियमित व्यायाम करा. जर तुम्ही कम्प्युटरवर बराच वेळ घालवत असाल तर मध्येच ब्रेक घ्या आणि डोळ्यांचा व्यायामही करा.

  • तुम्ही चश्मा लावत असाल तर दर 6-8 महिन्यांनी त्यांची तपासणी करा. नेहमी तुमचा चश्मा घाला आणि त्यांच्याशिवाय फोन, टीव्ही किंवा संगणक स्क्रोल करू नका.

  • डोळ्यांना हात लावण्यापूर्वी ते चांगले धुवावेत. हातावरील जंतूंचा डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

  • जर तुम्ही उन्हात बाहेर जात असाल तर सनग्लासेस जरूर लावा. तुमच्या डोळ्यांना 80-98 टक्के अतिनील किरणांपासून संरक्षण देणारे सनग्लासेस घाला.

  • धुम्रपान टाळा. त्याचा तुमच्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे, तुम्हाला गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात आणि दृष्टी कमकुवत होऊ शकते.

  • तुमच्या दृष्टीवर कोणताही परिणाम होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर आहार संतुलित ठेवा. याव्यतिरिक्त, डोळ्यांवर ताण येऊ शकतील अशा क्रियाकलापांमध्ये गुंतणे टाळा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT