WhatsApp Features,  Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp New Features : प्रतीक्षा संपली! व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येताहेत ५ जबरदस्त फीचर्स, चॅटिंग होईल अधिक मजेशीर

WhatsApp New Features Update : काही दिवसात व्हॉट्सअ‍ॅपच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्येही हे एआय फीचर दिसले होते. जाणून घेऊया व्हॉट्सअ‍ॅपच्या या ५ दमदार फीचर्सबद्दल

कोमल दामुद्रे

5 Upcoming Whatsapp Features :

व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी नवीन अपडेट आणली आहे. व्हॉट्सअ‍ॅपमुळे आपल्याला सहज अनेकांशी कनेक्ट होता येते.

मेटा च्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपसाठी (WhatsApp) येत्या काही दिवसांत अनेक जबरदस्त फीचर्स येणार आहेत. हे फीचर्स अँड्रॉइड आणि आयओएसच्या बीटा व्हर्जनमध्ये पाहायला मिळेल. काही दिवसात व्हॉट्सअ‍ॅपच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्येही हे एआय फीचर दिसले होते. जाणून घेऊया व्हॉट्सअ‍ॅपच्या या ५ दमदार फीचर्सबद्दल

1. एआय इमेज एडिटर

AI इमेज एडिटिंग फीचर लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पाहाता येणार आहे. याचा वापर करुन वापरकर्ते AI द्वारे कोणताही फोटो (Photo) एडिट करु शकता. व्हॉट्सअ‍ॅपचे हे फिचर नुकतेच अँड्रॉईड 2.24.7.13 बीट व्हर्जनमध्ये पाहायला मिळाले आहे.

2. Ask Meta AI

व्हॉट्सअ‍ॅपने देखील चॅटजीपीटी सारख्या मेसेजिंग अॅपमध्ये जनरेटिव्ह AI वैशिष्ट्य जोडले आहे. या फिचरमुळे व्हॉट्सअ‍ॅप अधिक इंटरअॅक्टिव्ह होणार आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे AI च्या माध्यमातून मिळू शकतील.

3. प्रायव्हेसी फीचर

व्हॉट्सअ‍ॅपच्या iOS 24.6.10.74 अपडेटसह नवीन प्रायव्हेसी फीचर दिसून आले आहे. या वैशिष्ट्याच्या मदतीने वापरकर्ते त्यांचा व्हॉट्सअॅप अवतार वापरण्याची परवानगी कोणाला द्यायची हे ठरवू शकतील. हे फीचर अँड्रॉईड बीटा व्हर्जनसाठीही आणले गेले आहे.

4. प्रिव्ह्यू लिंक डिसेबल

व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी फीचरवर काम सुरु आहे. हे Android बीटा आवृत्ती 2.24.7.12 स्पॉट करण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सनी शेअर केलेल्या लिंकचे प्रिव्ह्यू दिसणार नाही. ग्रुपमध्ये लिंक शेअर करताना या प्रायव्हसी फीचरचे पूर्वावलोकन होणार नाही.

5. IP पत्ता कॉल ब्लॉक

सुरक्षिततेसाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी एक नवीन फीचर्स येऊ शकते. ज्यामध्ये कॉल दरम्यान IP अँड्रेस ब्लॉक केला जाऊ शकतो. हे फीचर्स प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

SCROLL FOR NEXT