Jio 749 And 1198 Rechage जिओचा जबरदस्त रिचार्ज! 20 GB डेटा,14 OTT, अनलिमिटेड कॉल्स आणि बरेच काही...

Jio 749 And 1198 New Recharge Plan Details In Marathi : जिओने आपल्या ग्राहकांसाठी नेहमी जबरदस्त रिचार्ज ऑफर करत असते. रिलायन्स जिओची ही ऑफर प्रीपेड मोबाइल वापरकर्त्यांसाठी आहे.
Jio 749 And 1198 New Recharge Offers Details In Marathi
Jio 749 And 1198 New Recharge Offers Details In MarathiSaam Tv

Jio 749 And 1198 Recharge Plan Details :

जिओने आपल्या ग्राहकांसाठी नेहमी जबरदस्त रिचार्ज ऑफर करत असते. रिलायन्स जिओची ही ऑफर प्रीपेड मोबाइल वापरकर्त्यांसाठी आहे. याशिवाय जिओ आपल्या एका प्लानमध्ये १४ ओटीटी अॅप्सह १८ जीबी अतिरिक्त डेटा देखील देत आहे.

IPL 2024 पाहणाऱ्या युजर्ससाठी जिओ फ्री डेटा ऑफर (Offer) करते आहे. तसेच रिलायन्स जिओ आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लानसह अनलिमिटेड 5G डेटा मिळत आहे. जाणून घेऊया जिओच्या ऑफर्सबद्दल

1. 20GB डेटा ऑफर

जिओ आपल्या ७४९ रुपयांच्या (Price) प्रीपेड रिचार्ज प्लानसह अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे. या प्लानची वैधता ९० दिवसांची आहे. जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटाचा लाभ मिळेल. अतिरिक्त डेटासह वापरकर्त्यांना या प्लानमध्ये एकूण २०० जीबी डेटा मिळेल. याशिवाय वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची (Calls) ऑफर देखील देण्यात येत आहे. यामध्ये युजर्संना दिवसाला १०० फ्री एसएमएसचा लाभ घेता येणार आहे.

Jio 749 And 1198 New Recharge Offers Details In Marathi
Jio 219 And 399 Recharge Plan: युजर्सची मजा! स्वस्तात मस्त करा रिचार्ज; मिळेल Extra डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि बरंच काही...

या प्लानशिवाय रियालन्स जिओच्या ११९८ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये वापरकर्त्यांना १४ ओटीटी अॅप्सह १८ जीबी अतिरिक्त डेटा ऑफर केला जात आहे. जिओचा हा प्रीपेड प्लान ८४ दिवसांसाठी असणार आहे.

या प्रीपेड रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटाचा लाभ मिळेल. याशिवाय या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह दिवसाला १००० एसएमएसचा फ्रीमध्ये मिळणार आहे. या प्लानमध्ये एकूण १६८ जीबी डेटाचा लाभ मिळेल.

Jio 749 And 1198 New Recharge Offers Details In Marathi
Uric Acid Disease : बटाटे खाल्ल्याने शरीरातील युरिक अ‍ॅसिड वाढते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

2. 14 OTT अॅप्स फ्रीमध्ये मिळणार

या प्लानमध्ये कंपनी युजर्सना १४ ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन देत आहे. ज्यामध्ये Disney + Hotstar, Sony LIV, Amazon Prime Video, Zee5, Jio Cinema Premium, Lionsgate Play, Discovery +, Docubay, Epic On, Sun NXT, Hoichoi, Chaupal, Planet Marathi, Kanchha Lanka, Jio TV आणि Jio Cloud यांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com