WhatsApp Status
WhatsApp Status saam TV
लाईफस्टाईल

WhatsApp Status: गुपचूपमध्ये व्हॉट्सऍप स्टेटस बघायचे आहे ? जाणून घ्या 'या' सिक्रेट स्टेप्स

कोमल दामुद्रे

WhatsApp Status : व्हॉट्सऍप हे सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. संपूर्ण दुनियेतील तब्बल २ अरब व्यक्ती याचा वापर करतात. त्यातच मेटा व्हॉट्सऍपच्या फिचरमध्ये सातत्याने बदल करत असते. युजर्सना हे ऍप वापरताना ते अधिक सोपे आणि जास्त सेवा पुरवणारे असावे या उद्देशाने आता व्हॉट्सऍप स्टेटसमध्येही बदल होत आहेत.

व्हॉट्सऍपवरील स्टेटस हे इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबूक स्टोरी प्रमाणे असते. यात स्टोरी किंवा स्टेटस ठेवल्यावर ते २४ तासांनंतर अपोआप हटवले जाते. त्यामुळे अनेक युजरर्सना त्याची वेळ आणखीन जास्त असावी असे वाटते. त्यामुळे व्हॉट्सऍपच्या (WhatsApp) स्टेटसमध्ये बदल केले आहेत. यात तुम्ही कधीही समोरील व्यक्तीचे स्टेटस पाहू शकता.

गुपचूप स्टेटस कसे पाहायचे ?

  • आपण ज्या व्यक्तीचे स्टेटस पाहतो त्याला ते लगेच समजते. अशात अनेक वेळा समोरच्या व्यक्तीचे स्टेटस न पाहण्यासाठी आपण त्याला म्युट करतो.

  • मात्र असे करण्यापेक्षा डेक्सटॉपवर व्हॉट्सऍप सुरु करा आणि incognito modeऑन करा.

  • यात तुम्ही त्या व्यक्तीचे स्टेटस पाहीले तरी त्यांना तुमचे नाव दिसणार नाही.

  • फोनमध्ये देखील सेटींगमध्ये त्याचा पर्याय निवडता येतो.

  • कोणालाही कळू न देता स्टेटस पाहाण्याचा दुसरा पर्याय असा की, तुम्ही फोनमध्ये तुमची रिड रिसीप्ट बंद करा. त्याने तुम्हाला कोणाचेही स्टेटस पाहता येईल.

  • यात तुम्ही चॅटींग करत असताना दिसणारी ब्लू टिक देखील बंद होते आणि कुणाचे स्टेटस पाहिल्यावर त्या व्यक्तीला आपले नाव दिसत नाही.

असे करा रीड रिसीप्ट बंद

  1. तुमच्या स्मार्ट फोनमध्ये व्हॉर्ट्सऍप ओपन करा.

  2. वरती कोप-यात दिसत असलेले तीन बिंदू सिलेक्ट करुन सेटींगमध्ये जा.

  3. अकाउंटवर क्लिक करुन प्रायवेट हा पर्याय निवडा.

  4. नंतर रीड रिसीप्ट हा पर्याय डिसेबल करा.

गपचूप स्टेटस पाहण्याच्या दूस-या पध्दती

  1. व्हॉट्सऍप ओपन करा आणि त्यात स्टेटस लोड होऊ द्या.

  2. डाउनलोड झालेले स्टेटस तुम्ही वायफाय बंद केल्यावर गपचूप पाहू शकता.

  3. तुम्हाला माहित आहे का? फाइल मॅनेजर मधून देखील तुम्ही व्हॉट्सऍप स्टेटस पाहू शकता.

  4. फाइल मॅनेजरमधून इंटरनल स्टोरी हा पर्याय सिलेक्ट करा.

  5. त्यात पुढे व्हॉट्सऍप आणि मीडिया हे दोन पर्याय निवडा.

  6. त्यानंतर स्टेटस फोल्डर ओपन करा.

  7. यात तुम्हाला व्हॉट्सऍपवर शेअर करण्यात अलेले सर्व फोटो, व्हिडीओ आणि स्टेटस दिसतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : हरियाणात भाजपला मोठा धक्का; अपक्ष आमदारांनी समर्थन घेतल मागे

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना ईव्हीएमची पुजा भोवणार?

SCROLL FOR NEXT