Instagram Earnings
Instagram Earnings Saam Tv

Instagram Earnings : इन्स्टाग्रामद्वारे मिळवा बक्कळ पैसा, फॉलो करा या स्टेप्स

सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय अॅप इन्स्टाग्राम आहे.

Instagram Earnings : सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय अॅप इन्स्टाग्राम आहे. अनेक व्यक्ती करमणुकीसाठी याचा वापर करतात. एका अहवालानुसार इन्स्टाग्रामवर दर महिन्याला एक अब्जापेक्षा जास्त यूजर्स अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. यामुळे तुम्हाला जर सोशल मीडियामार्फत पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी एक उत्तम व्यवसाय संकल्पना आहे. तुम्ही इन्स्टाग्रामवर (Instagram) कंटेन्ट क्रिएटर म्हणून काम करुन भरपूर पैसे कमवू शकता.

रोजचे ५० कोटी लोक इन्स्टाग्रामचा वापर करतात. यात २५ ते ३४ वयोगटातील तरूण सर्वाधिक आहेत. अशात सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे ट्रेन्ड (Trend) वाढत आहे. त्यामुळे अनेक व्यवसायिक आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी त्यांचा वापर करतात. त्यामुळे तुम्ही देखील उत्तम कंटेन्ट क्रिएट करून अशा कंपन्यांच्या मदतीने उत्पन्नाचा मार्ग निर्माण करू शकता. तसेच इन्स्टाग्राममार्फत पैसे कमवू शकता.

Instagram Earnings
Instagram Down: भारतात इंस्टाग्राम डाऊन, ट्विटरवर अनेकांच्या तक्रारी

एक पोस्ट शेअर करून किती पैसे मिळतात -

इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्लुएन्सर आहेत. यात तुमचा प्रकार आणि फॉलोअर्सची संख्या यावर तुम्हाला किती पैसे मिळतील हे ठरते. इन्फ्लुएन्सरच्या प्रकारात नॅनो इन्फ्लुएन्सर, माइक्रो इन्फ्लुएन्सर, टॉप टिअर इन्फ्लुएन्सर, मिडल टिअर इन्फ्लुएन्सर आणि मेगा इन्फ्ल्यूएन्सर असे प्रकार आहेत. जर तुमचे ५००,००० पेक्षा जास्त फॉलोवर्स असतील तर १.२ लाख रुपये, टॉप टिअर इन्फ्लुएन्सरचे १००.००० ते ५००.००० फॉलोअर्स असतील तर एका पोस्टवर १ लाख रुपये मिळवता येतात. तसेच मिडील टिअर इन्फ्लुएन्सरला ६० हजार ते १००,००० फॉलोवर्स असल्यास प्रत्येक पोस्टवर ३५ ते ६० हजार रुपये दर मिळतात. मायक्रो इन्फ्लुएन्सरने १० ते ५० हजार फॉलोअर्स पूर्ण केल्यावर त्यांना १६ ते ३० हजार रुपये एका पोस्टसाठी मिळवता येतात. नॅनो इन्फ्लुएन्सरचे फॉलोअर्स सर्वात कमी असतात. यात २ ते ९ हजार फॉलोअर्सनां ४ ते १६ हजार रुपये प्रत्येक पोस्टवर कमवता येतात.

Instagram Earnings
Instagram Followers Tips : फक्त 'ही' ट्रिक वापरा, मिनिटात वाढतील Instagram चे फॉलोवर्स !

सोशल मीडियावर पैसे कमवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. मात्र त्यातही सर्वात जास्त लोकप्रिय पर्याय म्हणजे स्पॉन्सरशिप. यात अनेक कंपन्या आपल्या प्रोडक्टच्या मार्केटिंगसाठी स्पॉन्सर पोस्ट बनवत असतात. त्यामुळे त्यांना इन्फ्लुएन्सरची गरज पडते. यासह आता आणखीन एक फायदा असा की, तुम्ही तुमच्या व्यवसायाचे देखील चांगली जाहिरात करू शकता. त्यात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे प्रोडक्ट पोहचवू शकता. तसेच त्यामार्फत पैसे कमवू शकता.

अनेक क्रिएटर्स आपल्या प्रेक्षकांसाठी IGTV व्हिडीओ बनवत असतात. हे व्हिडिओ बराच वेळ चालतात. त्यामुळे अशा व्हिडीओंमध्ये जाहिरातींचा वापर केला जातो. यात सहसा १५ सेकंदाची जाहिरात असते. ही जाहिरात IGTV सुरू केल्यावरच प्ले होते. त्यामुळे अशा जाहिरातींच्या माध्यमातून उत्तम पैसे कमवता येतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com