Instagram
InstagramSaamTV

Instagram Down: भारतात इंस्टाग्राम डाऊन, ट्विटरवर अनेकांच्या तक्रारी

ट्विटरवर युजर इंस्टाग्राम डाऊन असा हॅशटॅग वापरुन ट्विट करत आहेत.

नवी दिल्ली : सोशल मीडियातील (Social Media) आघाडीचे असणारे प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम सध्या डाऊन झाले आहे. भारतातील अनेक भागात इनस्टाग्राम डाऊन झाल्यामुळे युजरांना फोटो, व्हिडिओ अपलोड करण्यासाठी व्यत्यय येत आहे. त्यामुळे अनेक युजरांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. तर ट्विटरवर युजरांनी इंस्टाग्राम डाऊन (Instagram Down) असा हॅशटॅग वापरुन ट्विट करत आहेत.

डाउन डिटेक्टरच्यानुसार, इंस्टाग्राम (Instagram) डाऊन झाल्याच्या बहुतांश बातम्या अॅप्सशी संबंधित आहेत. सुमारे ४४% तक्रारी अॅप वापरकर्त्यांनी केल्या आहेत, तर ३९% सर्व्हर कनेक्शन आणि १७% वेबसाइट डाउनच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

Instagram
कपिल सिब्बलांचा काँग्रेसला राजीनामा; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी

प्लॅटफॉर्म डाऊन झाल्यावर यावर मेटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मेटा ही व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मूळ कंपनी आहे. शेकडो भारतीय युजर्सनी इन्स्टाग्राम डाउनबद्दल तक्रारी केल्या आहेत. अनेक वापरकर्त्यांना अॅप ऍक्सेस करण्यात समस्या येत आहे.

Instagram
मुंबईकरांसाठी मोठी बातमी; दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही आता हेल्मेटसक्ती

इंस्टाग्राम (Instagram) डाऊनमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या सोशल मीडिया इंन्स्टाग्राम हे अॅप प्रसिध्द आहे. अनेक वापरकर्ते हे अॅप वापरतात. इंस्टाग्रावरती फोटो, व्हिडिओ अपलोड केले जातात. पण सध्या डाऊन झाल्यामुळे अपलोडिंग होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी तक्रारी दिल्या आहेत. अनेक इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी स्क्रीनशॉट पोस्ट करून माहिती दिली आहे. (Instagram Down)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com