कपिल सिब्बलांचा काँग्रेसचा राजीनामा; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी

कपिल सिब्बल यांनी १६ मे रोजी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला आहे.
Kapil Sibal quits congress Party,  Congress Party News, Political News Marathi
Kapil Sibal quits congress Party, Congress Party News, Political News MarathiSaam Tv
Published On

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांना सपातर्फे राज्यसभेची उमेदवारी मिळणार आहे. या संदर्भात सिब्बल यांनी माहिती दिली आहे. त्यांनी काँग्रेसला राजीनामा दिला असून सपाच्या पाठिंब्याने ते राज्यसभेवर जाणार आहेत. कपिल सिब्बल यांनी १६ मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीमाना दिला आहे. संसदेत स्वतंत्र आवाज असणे आवश्यक असल्याचे सिब्बल म्हणाले. (Rajya Sabha Latest News)

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव यांची लखनौमध्ये भेट घेतली. कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांना राज्यसभेवर पाठवण्यात आझम खान यांचा मोठा हात आहे. सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात आझम यांची केस लढवली होती. आझम यांना जामीन मिळवून देण्यात कपिल सिब्बल यांचे महत्त्वाचे योगदान आहे. सपाकडे राज्यसभेच्या आणखी दोन जागा शिल्लक आहेत, त्यावर अजुनही उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या जागांसाठी डिंपल यादव आणि जावेद अली खान यांची नावे आघाडीवर आहेत. (Kapil Sibal quits congress Party)

Kapil Sibal quits congress Party,  Congress Party News, Political News Marathi
मुंबईकरांसाठी मोठी बातमी; दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही आता हेल्मेटसक्ती

सिब्बल हे काँग्रेसच्या (Congress) सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाची आणि संघटनेची संपूर्ण फेरबदल करण्याची मागणी केली होती. काही दिवसापूर्वी त्यांनी गांधींच्या नेतृत्वावर टीका केली होती. गांधी घराण्याने काँग्रेस पक्षाचे नेतृत्व पद सोडावे अशी त्यांनी मागणी केली होती.(Rajya Sabha Latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com