WhatsApp Chat Lock  Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp Chat Lock : व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर लॉन्च! लॉक केलेल चॅट्स राहाणार सीक्रेट; कसे वापराल? प्रोसेस पाहा

Hide Chat In WhatsApp Using Secret Code : व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर आणले आहे. यामध्ये सेंटिग ऑन केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक करता येणार आहे. या चॅट लॉक फिचरच्या मदतीने चॅट लॉक करता येतील.

कोमल दामुद्रे

How To Lock WhatsApp Chat :

व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एकदा आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट आणले आहे. व्हॉट्सअ‍ॅपमुळे आपल्याला अनेकांशी लगेच कनेक्ट होता येते.

व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) एक नवीन फीचर आणले आहे. यामध्ये सेंटिग ऑन केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक करता येणार आहे. या चॅट लॉक फिचरच्या मदतीने चॅट लॉक करता येतील. तसेच या चॅट लॉकच्या मदतीने तुम्ही तुमचे चॅट लपवू देखील शकता. या चॅट लॉकच्या फीचरची प्रोसेस कशी असेल. त्याचा वापर कसा कराल? जाणून घेऊया

1. WhatsApp चॅट लॉक कसे कराल?

  • जर तुम्हाला तुमचे चॅट लॉक करायचे असतील तर काही सोप्या टिप्स (Tips) फॉलो कराव्या लागतील. यासाठी तुम्हाला चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या चॅटला लॉक करायचे आहे त्या नंबरवर क्लिक करा.

  • चॅट उघडल्यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर View Contact वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रोल करा तुम्हाला Chat Lock चा पर्याय दिसेल.

  • Chat Lock पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला Continue हा पर्याय दिसेल. या पर्यायवर क्लिक केल्यानंतर तुम्ही फेस लॉक किंवा फिंगरप्रिंट लॉकच्या मदतीने चॅट लॉक करु शकता.

2. WhatsApp चॅट लॉक फीचर कसे वापरावे?

फिंगरप्रिंट सेन्सरच्या मदतीने चॅट लॉक करण्यासाठी सेन्सरवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर चॅट लॉक होईल. हे चॅट तुम्हाला चॅट लिस्टच्या लॉक (Lock) केलेल्या चॅट्समध्ये हे सापडेल. जेव्हा तुम्ही फिंगरप्रिंट सेन्सर किंवा फेस अनलॉकचा वापर करता तेव्हा लॉक केलेले चॅट ओपन होतील.

3. लॉक केलेले चॅट लपवायचे कसे?

  • तुम्हाला लॉक केलेले चॅट लपवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला लॉक केलेले चॅट उघडावे लागेल. लॉक केलेले चॅट उघडताच वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.

  • तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चॅट लॉक सेंटिग्जचा पर्याय दिसेल. या पर्यायावर टॅप करताच तुम्हाला दोन पर्याय पाहायला मिळतील. Hide Locked Chats आणि Secret Code हे पर्याय पाहायला मिळतील.

  • लॉक केलेले चॅट लपवण्यासाठी तुम्हाला दोन्ही पर्यायांचा वापर करावा लागेल. Hide Locked Chats हा पर्याय ऑन करा आणि नंतर Secret Code च्या पर्यायवर क्लिक करा.

  • सिक्रेट कोडवर टॅप केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला कोड तयार करण्यास सांगेल. त्यानंतर तुम्हाला लॉक केलेले चॅट पाहाता येणार नाही.

4. लॉक केलेले चॅट कसे शोधाल?

लपवलेले चॅट शोधायचे असतील तर अॅप ओपन केल्यानंतर सर्च लिस्टमध्ये सिक्रेट कोड टाइप करुन सर्च करावे लागेल. त्यानंतर चॅट पुन्हा मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बनावट फोटो लावून जमिनीचा डेव्हलपमेंट करार, ११ जणांवर गुन्हा दाखल; कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

Roshani Walia : 'सन ऑफ सरदार २' मध्ये झळकणारी रोशनी वालिया कोण आहे?

Women Travel Tips: परदेशी प्रवास करताना महिलांनी कोणते कपडे घालू नयेत?

Coconut Water : नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? 99% लोकांना माहीत नसेल

Restaurant style sambar masala: घरच्या घरी कसा बनवाल साऊथ इंडियन रेस्टॉरंट स्टाईल सांबार मसाला

SCROLL FOR NEXT