WhatsApp Chat filter Features  Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp च नवं अपडेट! नव्या फीचरने चॅट करताना येणार मज्जा, मार्क झुकरबर्गने दिली माहिती

WhatsApp Chat filter Features : व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर आणखी एक नवीन फीचर जोडले आहे. हे फीचर चॅट फिल्टरचे असून मेटाच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने या फीचरची माहिती देणारी एक ब्लॉग पोस्ट जारी केलीये.

कोमल दामुद्रे

WhatsApp New Update

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या प्लॅटफॉर्मवर सतत नवीन फीचर्स जोडत असते. कंपनीने नुकतेच Android वापरकर्त्यांसाठी UI पुन्हा डिझाइन केले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन सर्च बार आणि मेटा एआय फीचर आणले आहे. परंतु, मेटा एआयचे हे फीचर सगळ्या युजर्ससाठी उपलब्ध नसेल.

आता व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) आपल्या प्लॅटफॉर्मवर आणखी एक नवीन फीचर जोडले आहे. हे फीचर चॅट फिल्टरचे असून मेटाच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने या फीचरची माहिती देणारी एक ब्लॉग पोस्ट (Post) जारी केलीये.

1. WhatsApp चॅट फिल्टर म्हणजे काय? 

याविषयीची माहिती स्वत: मेटाचे सीईओ यांनी दिली आहे. या फीचरनंतर तुम्ही सर्व मेसेज सहज फिल्टर करु शकाल. यामुळे चॅट ओपन करण्यासाठी लागणारा वेळ (Time) कमी होईल. यामध्ये कंपनी तुम्हाला वेगवेगळ्या चॅट्स फिल्टर करण्याचा पर्याय देत आहे.

हे फीचर आणण्याचे कारण असे की, वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समध्ये प्रवेश करणे सोपे व्हावे. आतापर्यंत युजर्सला व्हॉट्सअॅप ग्रुपमधील चॅट्स स्क्रोल करुन न वाचलेल्या मेसेजसाठी इनबॉक्स जावे लागते. आता यामध्ये फिल्टर्स मिळणारे आहे. ज्यामुळे तुम्ही एकाच ठिकाणी ग्रुप चॅट पाहू शकाल.

2. फीचर कसे काम करेल?

व्हॉट्सअॅपने तीन डीफॉल्टर फिल्टर सादर केले आहे. ज्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे चॅट्स करु शकता. यासाठी सर्वात आधी iOS किंवा Android स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल. तसेच तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट केले आहे की नाही हे चेक करा. त्यानंतर तुम्हाला सर्वात वर दिलेल्या तीन फिल्टरवर क्लिक करावे लागेल.

यामध्ये तुम्हाला All, Unread आणि Groups चा पर्याय मिळेल. हे सर्व चॅट्स तुम्हाला ऑल फिल्टरमध्ये दिसतील. ग्रुप फिल्टर वापरुन चॅट्स पाहू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

Nayanthara Lovestory: विवाहीत प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती नयनतारा, धर्मही बदलला मात्र नातं फार काळ टिकलं नाही....

Maharashtra News Live Updates: पुण्यात आचारसंहिता भंगाच्या १,२८५ तक्रारी

SCROLL FOR NEXT