Quit Non Veg For Month Saam Tv
लाईफस्टाईल

Quit Non Veg For Month: महिनाभर नॉन व्हेज खाल्लेच नाही तर आरोग्यावर काय परिणाम होईल?

Quitting Non Veg Benefits : असे म्हटले जाते की, श्रावण महिन्यात अनेकजण मासांहरी पदार्थांचे सेवन करणे टाळतात.

कोमल दामुद्रे

Benefits of Not Eating Non Veg Food: सध्या अधिक मास सुरु असल्यामुळे अनेकांनी श्रावण पाळला नसेल. परंतु, महाराष्ट्रात लवकरच श्रावण महिना सुरु होईल व तो अनेक लोक पाळतील देखील. असे म्हटले जाते की, श्रावण महिन्यात अनेकजण मासांहरी पदार्थांचे सेवन करणे टाळतात. एक ते दीड महिन्यापर्यंत हा श्रावण पाळला जातो.

मासांहार पदार्थ खाणाऱ्यांसाठी चिकन-मटण महिनाभर न खाणे अधिक अवघड होते. पण जर तुम्ही महिनाभर नॉन व्हेज खाल्लेच नाही तर तुमच्या शरीरात अनेक बदल दिसून येतील. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

हैदराबादच्या केअर हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अथर पाशा यांनी इंग्रजी वेबसाइटच्या मुलाखतीत सांगितले की, प्लांट बेस्ट फूड म्हणजेच शाकाहारी पदार्थांमध्ये (Food) भरपूर फायबर असते ज्यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते आणि पोटाच्या अनेक आजारांपासून (Disease) बचाव होतो. पोट चांगले असेल तर तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहते.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांत जगभरात विशेषतः अमेरिका आणि युरोपमध्ये शाकाहारी पदार्थ खाण्याचा कल हळूहळू वाढत आहे.

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ डॉ. एकता सिंघवाल यांनी देखील हे निदर्शनास आणून दिले की अनेक मांसाहारी लोक शाकाहारी पदार्थांकडे वळण्याची अनेक कारणे आहेत, नैतिक आणि पर्यावरणीय चिंतेपासून ते आरोग्याच्या फायद्यांपर्यंत आणि येथे शाकाहारी अन्नाची वाढती उपलब्धता देखील आहे. पर्याय देखील समाविष्ट आहेत.

त्यांनी सांगितले की, नॉन व्हेज न खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे सामान्यतः हृदयरोग, उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह आणि काही प्रकारचे कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. या व्यतिरिक्त, आपल्या आहारात विविध वनस्पती - आधारित पदार्थांचा समावेश करून, आपण मांसाहारावर अवलंबून न राहता आपल्या पौष्टिक गरजा पूर्ण करत आहात याची खात्री करू शकता.

जर तुम्ही महिनाभर मांसाहार करणे बंद केले तर तुमच्या शरीरात पाच बदल लगेच दिसून येतील.

1. बद्धकोष्ठतेपासून आराम

तज्ज्ञांनी सांगितले की, नॉन व्हेज खाण्याचे प्रमाण कमी केल्यास आतड्याची क्रिया सुरळीत होते व पचनसंस्था सुधारते. शरीरात फायबरचे प्रमाण वाढल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

2. वजन कमी होईल (Weight Loss)

व्हेज फूडमध्ये मासांहरापेक्षा कमी कॅलरीज असणारे पदार्थ असतात. तसेच त्यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही. वजनही नियंत्रणात राहाते.

3. अॅसिडीटीपासून सुटका

अनेकांना अॅसिडीटीचा सामना करावा लागतो. मासांहरी पदार्थांचे सेवन कमी केल्यास यापासून सुटका होऊ शकते.

4. कोलेस्ट्रॉल कमी होईल

व्हेज पदार्थांमध्ये संतृप्त व ट्रान्स फॅटचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते. जर नियमितपणे आहारात वनस्पती आधारित खाद्यपदार्थांचे सेवन केले तर कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारु शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: गुप्तांगात मिरची पावडर टाकली, उलटं लटकून मारहाण; पोलिसांचे 4 तरुणांसोबत भयंकर कृत्य

Air Plane Crash: उड्डाणानंतर काही क्षणातच विमानाच्या इंजिनला आग; पाहा थरारक VIDEO

Pune Ganeshotsav Special Trains : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव स्पेशल गाड्या; कुठे थांबणार? तारीख, वेळ जाणून घ्या...

नोकरीची भूलथाप, अत्याचार अन् अश्लील फोटो, भाजपमध्ये प्रवेश केलेला नेता अडकला; राजकीय वर्तुळात खळबळ

Pakistan flood : पाकिस्तानात पुराचा कहर; २० दिवसांत २०० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT