Breakfast Tips saam news
लाईफस्टाईल

Breakfast Tips: कमी वेळ अन् हेल्दी नाश्ता; सकाळच्या घाईगडबडीत बनवा 'हे' पदार्थ, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

Nutrition Tips: सकाळचा पौष्टिक नाश्ता केल्याने शरीरात दिवसभर ऊर्जा टिकते. तज्ज्ञांच्या मते इडली-सांबार, पोहे, उपमा आणि चीला हे चार सर्वोत्तम नाश्त्याचे पर्याय आहेत.

Sakshi Sunil Jadhav

नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे.

पौष्टिक नाश्त्यामुळे ऊर्जा टिकते आणि पचन सुधारते.

नाश्ता टाळल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

सध्याच्या धावपळीच्या जगात महिला असो वा पुरुष धावपळ ही होतेच. अशावेळेस घरातून नाश्ता करून निघणे हे कठीण होते. पण सकाळचा नाश्ता हा दिवसाच्या सुरुवातीचा महत्वाचा आहार मानला जातो. चांगला आणि पौष्टिक नाश्ता केल्याने शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहते. तसेच पचनसंस्थाही निरोगी राहते. अनेक जण वेळे मिळत नाही म्हणून नाश्ता टाळतात. यामुळे शरीरात कमजोरी, थकवा आणि स्ट्रेस वाढतो. पारंपरिक भारतीय नाश्त्यांमध्ये असे अनेक पदार्थ आहेत जे गट हेल्थ, पचनक्रिया आणि एनर्जी बूस्ट करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. त्यांनी चार सर्वात हेल्दी नाश्त्यांचे पर्याय सुचवले आहेत. इडली-सांबार, पोहे, उपमा आणि चीला.

इडली-सांबार

दक्षिण भारतातील लोकप्रिय डिश असलेला इडली-सांबार आज देशभरात आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. इडली तांदळाच्या पिठापासून तयार केली जाते आणि ती पचायला हलकी असते. न्यूट्रिशनिस्टच्या मते, इडली पोटातील चांगल्या बॅक्टेरियाचा विकास करते आणि सहज पचते. इडलीसोबत मिळणारा सांबर अनेक प्रकारच्या डाळी व भाज्यांपासून तयार केला जातो. त्यामुळे त्यात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. नारळाच्या चटणीत असलेले हेल्दी फॅट्स पचनासाठी उत्तम असतात. त्यामुळे इडली-सांभर हा संतुलित आणि प्रोटीनयुक्त नाश्ता मानला जातो.

पोहे

पोहे हा हलका पण सगळ्यात पौष्टीक नाश्ता आहे. त्यात प्रोटीनचे प्रमाण चांगले असते आणि तो सहज पचतो. जर पोह्यासोबत दही खाल्ले, तर त्याचा फायदा आणखी वाढतो. दह्यातील प्रोबायोटिक्स पचनसंस्था निरोगी ठेवतात आणि आंतड्यांमधील गुड बॅक्टेरिया वाढवतात. ज्यांना गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या तक्रारी असतात त्यांच्यासाठी पोहा हा सर्वोत्तम नाश्त्याचा पर्याय ठरतो.

उपमा

रवा किंवा मिलेट्सपासून तयार होणारा उपमा हा फायबरने भरलेला पदार्थ आहे. त्यात भाज्या टाकल्यामुळे तो जास्त पौष्टिक बनतो. उपम्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहतं, ऊर्जा मिळते, स्ट्रेस कमी होतो आणि भूक लवकर लागत नाही.

चीला किंवा पराठा

मूग डाळ किंवा बेसनापासून बनवलेला पराठा हा हाय प्रोटीनयुक्त आणि फायबरने समृद्ध नाश्ता आहे. तो मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. सकाळच्या वेळी चीला खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत राहते आणि शरीर दिवसभर ताजेतवाने वाटते. त्यामुळे नाश्ता कधीही स्किप करू नका आणि आपल्या थाळीत या हेल्दी पर्यायांचा समावेश करा.

सकाळचा नाश्ता का महत्वाचा असतो?

नाश्ता हा दिवसाची सुरुवात करणारा सर्वात महत्वाचा आहार आहे. तो शरीराला ऊर्जा देतो, पचन सुधारतो आणि दिवसभर एकाग्रता टिकवतो.

नाश्ता टाळल्यास काय परिणाम होतात?

नाश्ता न केल्याने थकवा, चिडचिड, कमजोरी आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात.

कोणते पारंपरिक पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम आहेत?

इडली-सांबार, पोहे, उपमा आणि चीला हे चार पारंपरिक आणि पौष्टिक नाश्त्याचे उत्तम पर्याय आहेत.

नाश्ता किती वेळेत करावा?

उठल्यावर साधारण १ ते २ तासांच्या आत नाश्ता करणे योग्य मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal-Budh Yuti: मंगळ-बुध ग्रहाची होणार महायुती; 'या' राशींची तिजोरी तुडुंब भरणार

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

SCROLL FOR NEXT