लाईफस्टाईल

Poha Chivda Recipe: पातळ पोह्यांचा चिवडा लगेच नरम पडतो? मग या टिप्स लक्षात ठेवा

Diwali 2025: पातळ पोह्यांचा चिवडा लगेच नरम पडतो का? या सोप्या घरगुती टिप्स वापरा आणि तुमचा चिवडा दिवाळीभर कुरकुरीत ठेवा. योग्य पोहे, भाजण्याची पद्धत आणि साठवणूक जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

दिवाळीत फराळ लगेचच नरम पडू नये यासाठी सोप्या टिप्स फॉलो करा.

पोहे निवडताना त्यांची जाडी योग्य पद्धतीने निवडा.

पोहे आधी कोरडे भाजल्यास कुरकुरीतपणा टिकतो.

दिवाळी म्हटलं की चिवड्याचा सुगंध घरभर दरवळतोच. पण बऱ्याचदा पातळ पोह्यांचा चिवडा बनवल्यानंतर काही तासांतच तो नरम पडतो, कुरकुरीतपणा जातो. हे टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवाव्यात. त्याचा वापर केल्याने तुमचा चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहील आणि आकसणारही नाही. शिवाय तुम्ही चिवडा बनवताना मोठ्या पातेल्या ऐवजी लहान कढईचा सुद्धा वापर करू शकता.

सगळ्यात आधी योग्य पोहे निवडणे महत्त्वाचं आहे. जास्त पातळ किंवा खूप हलके पोहे वापरू नका. मध्यम जाडीचे पातळ पोहे चिवड्यासाठी उत्तम असतात. पोहे मग चाळणीने चाळून त्यात काही खडा वगैरे आहे का ते तपासा. चिवडा बनवताना पोहे तळण्याऐवजी आधी कोरडे भाजून घ्या. मंद आचेवर ५-७ मिनिटे हलवत राहा. त्यामुळे पोह्यांचा ओलसरपणा कमी होतो आणि कुरकुरीतपणा अधिक काळ टिकतो.

१ किलो पोह्यांचे प्रमाण पुढील प्रमाणे

पोहे – १ किलो

शेंगदाणे – २०० ग्रॅम

डाळी (चणाडाळ किंवा फुटाणे) – १०० ग्रॅम

कढीपत्ता – २०-२५ पाने

हिरव्या मिरच्या – ८-१० (लहान तुकडे करून तळलेल्या)

साखर – २ टेबलस्पून

मीठ – चवीनुसार

हळद – १ टीस्पून

मोहरी – १ टीस्पून

तेल – साधारण १५० ते २०० मिली

कृती

पहिल्यांदा तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, मिरच्या, शेंगदाणे आणि डाळी भाजा. मग त्यात हळद, मीठ, साखर घाला. शेवटी भाजलेले पोहे घालून चांगले मिक्स करा. गॅस बंद करून थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.

टिप

चिवडा पूर्ण थंड झाल्यानंतरच डब्यात भरावा, अन्यथा ओलसरपणामुळे तो नरम पडतो. या पद्धतीने बनवलेला चिवडा महिनाभर कुरकुरीत राहतो.

पातळ पोह्यांचा चिवडा लगेचच नरम का पडतो?

ओलसरपणामुळे आणि गरम असतानाच डब्यात भरल्याने चिवडा नरम पडतो.

चिवडा कुरकुरीत ठेवण्यासाठी टिप्स काय?

पोहे आधी मंद आचेवर कोरडे भाजा आणि पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरा.

कोणते पोहे चिवड्यासाठी योग्य असतात?

मध्यम जाडीचे पातळ पोहे उत्तम असतात.

चिवडा किती दिवस टिकू शकतो?

योग्य साठवणुकीने घरगुती चिवडा एक महिन्यापर्यंत कुरकुरीत राहतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT