Weight loss problem, what the exact reason of sudden weight loss ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

अचानक वजन कमी होत असेल तर होऊ शकतो आपल्याला गंभीर आजार

वाढलेले वजन अचानक कमी झाल्यास कोणती लक्षणे आढळून येतात हे जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्याच्या जगात जास्त लोक आपल्या वाढलेल्या वजनामुळे त्रासलेले असतात. त्यामुळे आपले वजन कमी कसे होईल याकडे त्यांच अधिक लक्ष असते.

हे देखील पहा -

वजन कमी करण्यासाठी आपण व्यायामासोबत आहारात देखील बदल करत असतो परंतु, काहीच न करता आपले वजन कमी होत असेल तर ती चिंतेची बाब असू शकते. महिन्याभरात आपले वजन कमी होत असेल तर आपल्याला आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशावेळी आपले वजन अचानक कमी का होत आहे त्याचे कारण शोधायला हवे व वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. वजन का कमी होत आहे त्याची कारणे जाणून घेऊया.

१. कॅन्सर हा असामान्य आजार नाही. त्याची लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. त्यापैकी एक वाढलेले वजन अचानकपणे कमी होणे व त्यासोबत इतर आरोग्याच्या बाबतीत बदल होत असेल तर वेळीच त्याची चाचणी करा.

२. आपल्या शरीरातील साखरेची (Sugar) पातळी वाढल्यानंतर आपल्याला मधुमेह होतो व त्याचा परिणाम आपल्या वजनावर पडू शकतो. त्यामुळेही आपले वजनही कमी होऊ शकते. जसं जसं आपल्या शरीरातील साखरेची पातळी वाढत जाते तस तसे त्याचा परिणाम आपल्या वजनावर होत जातो. साखर रक्तात साठून राहते व ती आपल्या पेंशीपर्यंत पोहोचत नसल्यामुळे वजन कमी होते.

३. बऱ्याच लोकांना हाइपर थॉयराइडची समस्या असली की, त्याचेही वजन अचानक कमी होऊ लागते. यांचे कारण असे की, थॉयराइडची ग्रंथी त्याचे कार्य सुरळीत करत नाही व त्यामुळे आपल्या चयापचय परिणाम होतो व त्यामुळे आपले वजन कमी होते.

४. अनेक वेळा पाणी (Water) कमी प्यायल्याने किंवा डिटॉक्स ड्रिंकचे सेवन केल्याने आपले वजन कमी होते. कमी मीठाचे प्रमाण शरीराला निर्जलीकरण करते. तसेच जास्त घाम येण्यामुळेही आपले वजन कमी होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

SCROLL FOR NEXT