Blood sugar test saam tv
लाईफस्टाईल

Blood sugar test: घरी ब्लड शुगर टेस्ट करताना सुई टोचल्यावर काय करावं? 'ही' 1 चूक करणं आजच थांबवा

Blood sugar testing at home: घरच्या घरी ग्लुकोमीटरने शुगर तपासताना पहिला की दुसरा रक्ताचा थेंब वापरावा? फास्टिंग आणि जेवणानंतर शुगर तपासण्याची योग्य वेळ कोणती? बोट स्वच्छ ठेवण्यापासून रक्ताचा नमुना घेण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या आणि चुकीची रीडिंग टाळा.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल अनेकजण घरच्या घरी ग्लुकोमीटरच्या मदतीने ब्लड शुगर लेवल तपासतात. काही मिनिटांत शुगर किती आहे, हे आपल्या लक्षात येतं. मात्र शुगर तपासताना एक छोटीशी चूक झाली तरी रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो. त्यामुळे बोटाला सुई टोचल्यानंतर आलेल्या रक्ताच्या पहिल्या थेंबाने तपासणी करायची की दुसऱ्या थेंबाने हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

यासंदर्भात एम्स नवी दिल्लीच्या एंडोक्रायनोलॉजी आणि मेटाबॉलिझम विभागातील प्रोफेसर डॉ. राजेश खड़गावत यांनी आजतकला माहिती दिलीये. त्यांच्या म्हणण्यानुसार, घरच्या घरी शुगर तपासताना काही गोष्टींची काळजी घेतली तर योग्य रीडिंग मिळण्याची शक्यता वाढते.

शुगर तपासण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

शुगर तपासण्यापूर्वी काही वेळ शांतपणे बसा. हात सैल ठेवा. बोटाला सुई टोचण्यापूर्वी हात कंबरेच्या पातळीपेक्षा खाली ठेवणे योग्य आहे. यामुळे रक्ताची योग्य प्रकारे तपासणी होण्यास मदत होते.

रक्ताचा पहिला की दुसरा थेंब?

घरच्या घरी शुगर तपासताना पहिला रक्ताचा थेंब स्ट्रिपवर घेऊ नये. बोटाला सुई टोचल्यानंतर आलेला पहिला थेंब कापसाने पुसून घ्यावा. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या थेंबाने शुगरची तपासणी करावी. बोटातून रक्त सहज बाहेर येत नसेल तर बोट जोरात दाबू नका. जास्त दाब दिल्यामुळे बोटाच्या आसपासच्या पेशींना इजा होऊ शकते आणि त्याचा परिणाम तपासणीवरही होऊ शकतो.

पहिल्या थेंबाने तपासणी का करू नये?

अनेकदा लोक बोट स्वच्छ न करताच शुगर तपासतात. आपल्या बोटावर अन्नपदार्थांचे कण, धूळ किंवा जंतू असू शकतात. तसंच पहिल्या थेंबात त्वचेतील द्रव मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळे शुगरची रीडिंग योग्य न येण्याची शक्यता असते. म्हणून बोटाला सुई टोचल्यानंतर पहिला थेंब पुसून टाका आणि दुसऱ्या थेंबाने तपासणी करा, असा सल्ला डॉ. राजेश खड़गावत यांनी दिला आहे.

शुगर टेस्ट कोणत्या वेळी करावी?

  • फास्टिंग शुगर तपासायची असेल तर जेवण आणि तपासणी यामध्ये किमान ८ तासांचं अंतर असावं.

  • तर जेवणानंतरची शुगर तपासायची असेल तर जेवण झाल्यानंतर २ तासांनी तपासणी करावी.

  • फास्टिंगसाठी १० ते १२ तासांचे अंतर ठेवून किंवा जेवणानंतर ४ ते ५ तासांनी शुगर तपासल्यास त्याचा अपेक्षित उपयोग होत नाही. त्यामुळे शुगर तपासताना योग्य वेळ आणि योग्य पद्धत दोन्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Morning Tea Side Effects: सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने ॲसिडीटी होते का? आरोग्यावर होणारे 5 परिणाम जाणून घ्या

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये आणखी एक दुष्काळाचा बळी; नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.57 मिळाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! वाचा संपूर्ण गणित

मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसवर CBI चा छापा! OSD वर गुन्हा दाखल, राजकारणात मोठा भूकंप

Rain Alert : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, कोकणासह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान विभागाचा नेमका इशारा काय?

SCROLL FOR NEXT