High blood pressure: रोज सकाळी BP वाढतोय? ही 5 ड्रिंक्स नैसर्गिकरित्या कमी करतील रक्तदाब

Surabhi Jayashree Jagdish

रक्तदाब नियंत्रण

केवळ एखादं पेय घेतल्याने रक्तदाब नियंत्रणात येत नाही, त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाल यांनाही तितकंच महत्त्व आहे. आहारातील अतिरिक्त मीठ कमी करणं, वजन नियंत्रणात ठेवणं आणि ताणतणावाचं नियंत्रणात करणं रक्तदाबासाठी फायदेशीर ठरतं.

High blood pressure drinks | saam tv

रक्तदाब नियमित तपासणं

उच्च रक्तदाब अनेकदा स्पष्ट लक्षणांशिवायही राहू शकतो, त्यामुळे नियमित रक्तदाब तपासणी करणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी रक्तदाबासाठी औषधं सुरू केली असल्यास ही पेये घेताना औषधे स्वतःहून बंद किंवा कमी करू नयेत.

Healthy drinks for BP | saam tv

कोमट लिंबूपाणी

सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून घेतल्याने दिवसाची सुरुवात फ्रेश होते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात. जे संतुलित आहाराचा भाग म्हणून आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

Blood pressure control | saam tv

हिबिस्कस टी

हिबिस्कस म्हणजे जास्वंदीच्या फुलांपासून तयार केलेला चहा असून त्यामध्ये विविध अँटिऑक्सिडंट घटक आढळतात. नियमित प्रमाणात हिबिस्कस टीचं सेवन केल्याने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते.

Natural drinks for high BP | saam tv

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्ससह अनेक अँटिऑक्सिडंट घटक असतात जे रक्तवाहिन्यांच्या कार्यासाठी उपयुक्त मानले जातात. त्याचं नियमित आणि मर्यादित सेवन रक्तवाहिन्यांचं आरोग्य राखण्यास मदत करू शकतं आणि रक्तदाब नियंत्रणात हातभार लावू शकते.

Drinks to lower blood pressure | saam tv

बीटरूट ज्यूस

बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात, ज्यांचं शरीरात रूपांतर नायट्रिक ऑक्साइडमध्ये होतं. नायट्रिक ऑक्साइडमुळे रक्तवाहिन्या रुंद होण्यास मदत होते आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

High BP diet | saam tv

डाळिंबाचा रस

डाळिंबामध्ये पॉलीफेनॉल्स आणि इतर अँटिऑक्सिडंट घटक असतात, जे हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. डाळिंबाच्या रसाचे नियमित सेवन रक्तदाबाच्या पातळीवर सकारात्मक परिणाम करण्यास मदत करू शकते.

Hibiscus tea for blood pressure | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

High BP prevention | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Morning drink | saam tv
येथे क्लिक करा