Surabhi Jayashree Jagdish
उच्च रक्तदाबाची समस्या शरीरावर परिणाम करतं. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेली औषधं, योग्य आहार आणि नियमित जीवनशैली महत्त्वाची असते. यासोबत काही नैसर्गिक डिंक्स्चा आहारात समावेश केल्यास शरीराला अतिरिक्त पोषण मिळू शकतं.
बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात. ज्यांचं शरीरात रूपांतर नायट्रिक ऑक्साइडमध्ये होऊ शकतं. नायट्रिक ऑक्साइडमुळे रक्तवाहिन्यांना शिथिल होण्यास मदत होते आणि रक्तप्रवाह सुरळीत होऊ लागतो.
एक्सेटर विद्यापीठातील संशोधनानुसार, बीटरूट ज्यूसच्या सेवनामुळे तोंडातील काही जीवाणूंमध्ये होणारे बदल नायट्रिक ऑक्साइडच्या निर्मितीशी संबंधित असू शकतात. दररोज साधारण ७० ते २५० मिली बीटरूट ज्यूसचे सेवन केल्यास रक्तदाबावर परिणाम दिसून येऊ शकतो आणि नियमित सेवनाने हा फायदा अधिक जाणवू शकतो.
कॅमोमाइल टीमध्ये कॅफीन नसल्यामुळे रात्रीच्या वेळी या ड्रिंकचा वापर केला जातो. यामुळे तणाव कमी होण्यास आणि झोपेसाठी शरीराला तयार होण्यास मदत मिळू शकते. तणाव आणि अपुरी झोप यांचा रक्तदाबावर परिणाम होतो.
काही संशोधनांमध्ये कॅमोमाइलच्या सेवनाचा LDL कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सच्या पातळीशी संबंध आढळलाय. या चहामध्ये कॅफीन नसल्याने रात्रीच्या वेळी घेतल्यावर कॅफीनमुळे होणारी अस्वस्थता किंवा झोपेवर होणारा परिणाम टाळता येतो.
लो-फॅट किंवा स्किम्ड दूध हे रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या आहाराचा एक भाग आहे. दुधामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं. जे रक्तवाहिन्यांचे कार्य आणि शरीरातील द्रवांचं संतुलन राखण्यास मदत करतात.
दूध घेताना लो-फॅट किंवा स्किम्ड दूध निवडा. दुधामध्ये अतिरिक्त साखर, फ्लेवर्ड सिरप किंवा गोड पदार्थ मिसळणं टाळल्यास अनावश्यक कॅलरीजचं सेवन कमी करता येतं.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.