Mental health issues SAAM TV
लाईफस्टाईल

Mental health issues: मुलांच्या मनात नेमकं काय सुरु आहे? तज्ज्ञांनी सांगितलेल्या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Signs parents should not ignore experts: आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात केवळ प्रौढांनाच नाही, तर लहान मुलांनाही प्रचंड मानसिक ताण जाणवतो. मात्र, मुले त्यांच्या मनातील भावना आणि समस्या स्पष्टपणे बोलून दाखवू शकत नाहीत.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही वर्षांत मुलांचं पालनपोषण करणं किंवा त्यांना सांभाळणं हे पालकांसाठी काही प्रमाणात एक आव्हान बनलं आहे. याचं कारण म्हणजे डिजीटल युग...या युगात मुलांना फोन, टीव्ही आणि सोशल मीडियापासून दूर ठेवणं कठीण झालं आहे. या गोष्टींमुळे मुलांना वयापूर्वीच अनेक गोष्टींची माहिती मिळते, ज्यामुळे अनेकदा मुलं आणि पालक दोघांसाठीही आव्हानं निर्माण होतात.

मुलांच्या भावना समजून घेणं आणि त्यांना योग्य मार्गावर नेणं हे कोणत्याही पालकांसाठी अत्यंत कठीण काम आहे. अलीकडे मुलांच्या आत्महत्येशी संबंधित अनेक घटना समोर आल्या आहेत. जयपूरमध्ये तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली, तर दिल्लीमध्ये 16 वर्षांच्या एका मुलाने आत्महत्या केली. या घटनांनी प्रत्येक पालकांना मोठा धक्का बसला आहे.

अभ्यास, खेळ यांसोबतच मुलांना समजून घेणं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीत पालकांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. मुलांच्या मनात काय चालले आहे, ते काय विचार करतात आणि त्यांच्यासोबत काय घडतंय या गोष्टी पालकांनी जाणून घेणं गरजेचं आहे.

मुलांमध्ये दिसणाऱ्या या सुरुवातीच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

वारंवार आत्महत्येची किंवा मृत्यूची चर्चा करणं

जर तुमचं मूल अशा प्रकारच्या गोष्टी बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वाक्यांना ‘ड्रामा’ किंवा ‘एटेंशन-सीकिंग’ म्हणून नाकारू नका. ही वाक्यं त्यांच्या आतल्या भावना किंवा निराशेचे संकेत असू शकतात.

स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न करणं

हातावर इजा करून घेणं, भिंतीवर डोकं आपटणं किंवा स्वतःला दुखापत करणं हे देखील संकेत असू शकतात. हे आत्मघाती विचारांची सुरुवात असू शकते.

स्वतःची काळजी घेणं सोडून देणं

अचानक सवयी बदलणं, जसं की, आंघोळ न करणं, स्वच्छता न राखणं, न खाणं किंवा खूप कमी खाणं, झोपेची पद्धत बिघडणं हे सर्व आतील संघर्ष, नैराश्य किंवा चिंतेचे संकेत असू शकतात.

आवडत्या गोष्टींपासून दूर जाणे

जर मूल अचानक खोलीत बंद राहू लागलं, मित्रांपासून दूर राहायला लागलं किंवा कुटुंबाशी बोलणं बंद केलं आणि पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस कमी दाखवू लागलं तर हे नैराश्याचे संकेत असतात.

पालकांनी काय केलं पाहिजे?

  • मुलांच्या प्रत्येक बोलण्याला आणि वर्तनाला गंभीरतेने घ्या.

  • मुलांना ओरडण्याऐवजी त्यांचं फक्त ऐका.

  • मुलांसाठी एक सुरक्षिततेचं वातावरण तयार करा

  • शाळा किंवा सोशल मीडियाचा दबाव समजून घेण्याचा प्रयत्न करा.

  • किशोरवयीन मुलांशी मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाने चर्चा करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govt Hospital Scandal: चादर अंगावर ओढली; हॉस्पिटलच्या वेटिंग एरियातच जोडप्याने ठेवले शरीरसंबंध; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले

Aloo Lachcha Recipe: संध्याकाळचा नाश्त्याला बनवा क्रिस्पी अन् टेस्टी आलू लच्छा, सोपी आहे रेसिपी

Maharashtra Live News Update : : माळेगाव येथील भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ

Maharashtra Politics: ऐतिहासिक विजय! दोंडाईचामध्ये भाजपच्या सर्व २६ नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध

Factory Blast : 'मृत्यूची फॅक्टरी'! बॉयलरच्या स्फोटात १५ कामगारांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

SCROLL FOR NEXT