Sleep Care Google
लाईफस्टाईल

Sleep Care: रोज अपूरी झोप? मेंदूवर होईल गंभीर परिणाम, वेळीच 'हे' परिणाम ओळखा

Mental Health: ८७% प्रौढांना पुरेशी झोप मिळत नाही. यामुळे ताण, थकवा, डिप्रेशन, आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. गाढ झोप घेतल्यास आरोग्य, मानसिक स्थैर्य आणि पुनर्प्राप्ती सुधारते.

Sakshi Sunil Jadhav

  1. ८७% प्रौढांना पुरेशी झोप मिळत नाही.

  2. पूर्ण झोपेमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं.

  3. कमी झोपेमुळे डिप्रेशन, ताण, हृदयरोगाचा धोका वाढतो.

  4. गाढ झोप रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्साठी आवश्यक आहे.

झोप ही शरीरासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. झोपेमुळे मानसिक आरोग्य आणि गुणवत्ता सुधारते. तुम्हाला अनुभव आलाच असेल की झोप पूर्ण नाही झाली ती आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. प्रचंड थकवा आणि आळस असल्यामुळे आपण आपली दैनंदिन कामं सुद्धा करु शकत नाही. तसेच जर दिर्घकाळ झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काही गंभीर आजारांना सुद्धा सामोरे जावे लागते. पुढे आपण झोप पूर्ण न झाल्याने शरीरावर किती मोठा परिणाम होतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

चांगल्या शरीरासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे. 87% जास्त लोक 8 तासांपेक्षा पुरेशी झोप घेत नाहीत. जवळजवळ 20% लोक हे फक्त ६ तासांपेक्षा कमी झोप घ्यायचे. त्यामुळे त्यांना दीर्घकाळ आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये महिला या जास्त झोप घेतात. दररोज ७ तास तर पुरुष ६ तास झोप घेतात. जास्तवेळ झोप घेतल्याने शरीराचा थकवा, ताण कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच स्नायुंच्या समस्या संपतात. तसेच जे व्यक्ती जास्त झोप घेतात त्यांनाच गाढ झोप लागते.

झोपेचा परिणाम शरीरावर कसा होतो?

सगळ्यात महत्वाचे सांगायचे झाले तर गाढ झोप घेतल्याने शरीर tissues मजबूत करते, हार्मोन्स बॅलेन्स होतात, आणि रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही, तर याचा उलट परिणाम शरीरावर जाणवतो. कमी झोप घेतल्याने सगळ्यात जास्त परिणाम मेंदूवर होत असतो. जास्त झोप घेतल्याने डिप्रेशन, ताण, भिती, विचार करण्याची क्षमता, नविन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढते.

जर तुम्ही झोप घेतली नाहीतर चिंतेचे, नैराश्याचेही प्रमाण वाढायला लागते. जास्त ताण घेणाऱ्यांसाठी झोप खूप महत्वाची असते. तुम्ही जर झोप कमी घेतली तर शरीरात जळजळ वाढते. जी हदयरोग आणि चयापचय विकारांशी जोडलेली आहे. कमी झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ज्यामुळे व्यक्ती आजारांना बळी पडतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp वर ऑनलाइन दिसणे लपवायचे आहे? फॉलो करा 'ही' सोपी स्टेप्स

LIC Policy: फक्त ५० हजार गुंतवा, महिन्याला मिळवा ₹४,८५२ व्याज; LICची धमाकेदार योजना

Maharashtra Live News Update: - मातंग समाजाला लोकसंख्याप्रमाणे निधी आवश्यक; गणेश नाईकांची भूमिका

'माझ्या गावात येऊन तर दाखवा', मंत्री गुलाबराव पाटलांचा बच्चू कडूंना थेट आव्हान

'तुझे कपडेच काय, तुझीxxx.. सुद्धा ठेवणार नाही'; वाटेगावकरांकडून गोपीचंद पडळकरांना सज्जड दम

SCROLL FOR NEXT