हिवाळ्याचे आगमन झाले की वर्षाचा शेवट येतो. वर्षभरात केलेली कामे, मिळवलेलं यश, पाप-पुण्य अशा सगळ्यांचा शेवट होतो आणि प्रत्येक व्यक्ती नव्या वर्षाचे नवे संकल्प करून पुन्हा कामाला लागतो. काहींना वर्षभर यश मिळतं किंवा काहींना मिळतच नाही. अशावेळेस खचून न जाता तुम्ही काही वास्तूशास्त्राचे नियम फॉलो करून नव्या वर्षाची चांगली आणि मोठ्या सकारात्मकतेच्या ताकदीने सुरुवात करू शकता. पुढे आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
येणाऱ्या नव्या वर्षाची खासियत म्हणजे, नवीन वर्ष 2026 चा पहिला दिवस प्रत्येकासाठी खास असणार आहे. 1 जानेवारी 2026 रोजी जगभरात नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात आणि आनंदात केले जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षाची सुरुवात ज्या ऊर्जा आणि भावनेने होते, त्याचा प्रभाव संपूर्ण वर्षभर राहतो. त्यामुळे जर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही खास धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय केले, तर वर्षभर दुर्दैव दूर राहते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते, असे मानले जाते.
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी घरातील कचरा, न वापरणाऱ्या आणि पडीक वस्तू बाहेर काढून घर स्वच्छ व नीटनेटके ठेवावे. घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदीचे पाणी किंवा गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळची सुरुवात देवाच्या स्मरणाने करावी. उठल्यानंतर सगळ्यात आधी देवाला नमस्कार करून आपल्या कुटुंबावर आणि स्वतःवर कृपा राहावी, अशी प्रार्थना करावी. ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करणे, सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करणे आणि देवघरात दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. याच दिवशी दररोज स्नान, ध्यान आणि पूजा करण्याचा संकल्प केल्यास जीवनात शिस्त आणि सकारात्मकता वाढते.
विशेष म्हणजे नवीन वर्ष 2026 ची सुरुवात गुरुवारी होत आहे. गुरुवार हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वार मानला जातो. त्यामुळे या दिवशी घरात तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ ठरते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि विष्णू भगवान प्रसन्न होतात. घरात आधीच तुळस असल्यास तिला जल अर्पण करून पूजा करून दिवा लावावा. याशिवाय नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजू आणि गरीब लोकांना अन्नदान, गरम कपडे किंवा चादर दान करणे श्रेष्ठ मानले जाते. दान केल्याने पितृ आणि देवकृपा संपूर्ण वर्षभर कायम राहते, असे मानले जाते. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार या दिवशी नक्कीच दान करावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.