Vastu Tips For Removing Flowers From Home Temple saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: देवाला वाहिलेली फुलं विसर्जित करण्याची योग्य वेळ कोणती? शास्त्रात सांगितलाय महत्त्वाचा नियम

Vastu Tips For Removing Flowers From Home Temple: आपल्या हिंदू धर्मात देवाची पूजा करताना फुले अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. फुलांना पावित्र्य आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. देवाला फुलं वाहिल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि मनाला शांती मिळते अशी मान्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मात देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. देवपूजेच्या माध्यमातून भक्त आपली श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करतात. असं मानलं जातं की, जर एखाद्याने खरी श्रद्धा ठेवून आणि योग्य पद्धतीने पूजा केली तर केवळ मनाला शांती मिळते असं नाही, तर घरात सकारात्मक उर्जा देखील निर्माण होते.

वास्तूशास्त्रातील नियम काय सांगतात?

वास्तुशास्त्रातही पूजेसंबंधित काही नियम सांगितले गेले आहेत. असं मानण्यात येतं की, या नियमांचे पालन केल्यास घराची वास्तू चांगली राहते आणि जीवनात सुख-समृद्धी येते. मात्र, काही गोष्टींविषयी लोकांमध्ये संभ्रमही असतो. त्यापैकी एक म्हणजे देवांना अर्पण केलेल्या फुलांबद्दल. अनेकदा भक्तांना प्रश्न पडतो की, देवांना अर्पण केलेली फुलं मंदिरातून किंवा देव्हाऱ्यातून कधी काढून विसर्जित केली पाहिजेत?

देवांना अर्पण केलेली फुलं मंदिरातून कधी काढावीत?

पूजेच्या वेळी बहुतांश लोक देवांना फुलं अर्पण करतात. पण अनेकदा ती फुले वेळेत काढली जात नाहीत. वास्तुशास्त्रानुसार, देवांना अर्पण केलेली फुलं तात्काळ काढायची नसली तरी सूर्यास्त होण्यापूर्वी ती काढून विसर्जित केली पाहिजेत.

वास्तुशास्त्रानुसार, कोमेजलेली किंवा सुकलेली फुलं मंदिरात ठेवणं शुभ मानलं जात नाही. अशी फुलं घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण होण्याची भीती अधिक असते. अशावेळी घरातील सदस्यांमध्ये चिडचिड किंवा राग वाढू शकतो. त्यामुलेच देवघरात ठेवलेली फुलं योग्य वेळी काढून विसर्जित करणं आवश्यक आहे.

ही गोष्ट लक्षात ठेवा

जर तुम्ही घरच्या झाडावरून फुलं तोडून देवांना अर्पण करत असाल, तर सर्वप्रथम स्नान करून घ्यावं. त्यानंतर फुले स्वच्छ पाण्याने धुवावीत. वास्तुशास्त्रानुसार, धुतलेली फुलं नेहमी देठाच्या बाजूने धरूनच देवांना अर्पण करावीत.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - भांडुप रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची बत्ती गुल

Rutuja Bagwe: मुंबईत नाही तर या ठिकाणी घेतलं ऋतुजाने शिक्षण

Varicha Dosa Recipe : नवरात्रीत उपवासाला बनवा वरीचा डोसा, १० मिनिटांत रेसिपी तयार

Shahad Bridge: महत्वाची बातमी! शहाड पूल १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्गाचा करा वापर

Marathi Movie: 'लास्ट स्टॉप खांदा...' चित्रपटाचं कलरफुल पोस्टर लाँच; श्रमेश बेटकरसोबत दिसणार ही अभिनेत्री

SCROLL FOR NEXT