Dhanshri Shintre
ध्यान, योग व आध्यात्मिक साधनेसाठी घराचा पूर्व किंवा ईशान्य कोपरा सर्वाधिक शांतता व सकारात्मक ऊर्जा देतो.
वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक वस्तू विशिष्ट उर्जेशी संबंधित असते आणि तिची दिशा जीवनावर प्रभाव टाकते.
चुकीच्या दिशेने वस्तू ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते, असे मानले जाते.
या लेखातून तुम्हाला घरात कपाट कोणत्या दिशेला ठेवावे लागते ते जाणून घेता येईल, वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा.
बेडरूममध्ये वॉर्डरोब ठेवताना ते बेडच्या संपर्कात येणार नाही याची विशेष काळजी घ्या, वास्तुनुसार ही गोष्ट महत्त्वाची आहे.
तिजोरीसाठी कपाट घेतल्यास ते कधीही पूर्णपणे रिकामे ठेवू नये; त्यात पैसे किंवा दागिने असणे शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, घरात लाकूड किंवा लोखंडापासून बनवलेली कपाटे ठेवणे अधिक शुभ व सकारात्मक ऊर्जा वाढवणारी मानली जातात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.