blood sugar test timing google
लाईफस्टाईल

Blood Sugar Test: ब्लड शुगर तपासण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या मधुमेह नियंत्रणासाठी महत्त्वाचे नियम

Blood Glucose Monitoring: रक्तातील साखर तपासण्याची योग्य वेळ कोणती, उपाशीपोटी आणि जेवणानंतरची चाचणी का महत्त्वाची आहे, तसेच सामान्य, प्रीडायबिटीज आणि मधुमेहासाठी ब्लड शुगरची योग्य श्रेणी काय असते याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

तुमची रक्तातील साखर योग्य पातळीवर आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी केवळ चाचणी करणे पुरेसं नसतं. ती चाचणी नेमकी कोणत्या वेळी केली जाते हेही तितकेच महत्त्वाचं असतं. मधुमेह असो, प्रीडायबिटीज असो किंवा आरोग्याबाबत जागरूकता म्हणून ब्लड शुगरवर लक्ष ठेवत असाल तर योग्य वेळी तपासणी केल्यास शरीरातील ग्लुकोजची अचूक माहिती मिळू शकते.

योग्य वेळ का महत्त्वाची?

दिवसभरात रक्तातील साखरेची पातळी सतत बदलत असते. आपण काय खातो, किती शारीरिक हालचाल करतो, तणावाची पातळी किती आहे आणि झोप कशी झाली आहे याचा त्यावर परिणाम होतो. चुकीच्या वेळी केलेली चाचणी योग्य परिणाम देऊ शकत नाही. जसं की, जेवणानंतर लगेच तपासणी केली तर साखरेची पातळी नैसर्गिकरित्या जास्त दिसू शकते.

त्यामुळे योग्य वेळेवर रक्तातील साखर तपासल्यास तिच्यातील चढ-उतार समजण्यास मदत होते आणि डॉक्टरांनाही तुमच्या आरोग्याचं अधिक अचूक मूल्यांकन करता येतं.

उपाशीपोटी रक्तातील साखरेची चाचणी

चाचणी कधी करावी?

सकाळी उठल्यानंतर काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी, किमान 8 तास उपवास केल्यानंतर ही चाचणी करावी.

का महत्त्वाची आहे?

ही चाचणी रात्रीच्या काळात शरीराने ग्लुकोजचे नियंत्रण कसं ठेवलं आहे, याची माहिती देते. मधुमेह किंवा प्रीडायबिटीजचे निदान करण्यासाठी ही सर्वात विश्वासातील चाचण्यांपैकी एक मानली जाते.

सामान्य श्रेणी

  • सामान्य : 70 ते 99 mg/dL

  • प्रीडायबिटीज : 100 ते 125 mg/dL

  • मधुमेह : 126 mg/dL किंवा त्यापेक्षा जास्त

नियमितपणे उपाशीपोटी साखरेची तपासणी केल्यास इन्सुलिन प्रतिकाराची सुरुवातीची लक्षणं तुम्हाला दिसून येऊ शकतात.

जेवणानंतरची रक्तातील साखरेची चाचणी

चाचणी कधी करावी?

जेवण सुरू केल्यानंतर साधारण दोन तासांनी ही चाचणी करावी.

का महत्त्वाची आहे?

जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी ही तुमचे शरीर अन्नातून मिळालेल्या ग्लुकोजचं किती प्रभावीपणे चयापचय करतं हे समजतं. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी ही तपासणी विशेष महत्त्वाची असतं. कारण जेवणानंतर रक्तातील साखरेत होणारी वाढ नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन किंवा इतर औषधे किती परिणामकारक आहेत याची माहिती या चाचणीतून मिळते.

सामान्य श्रेणी

  • सामान्य : 140 mg/dL पेक्षा कमी

  • प्रीडायबिटीज : 140 ते 199 mg/dL

  • मधुमेह : 200 mg/dL किंवा त्यापेक्षा जास्त

जर जेवणानंतरची ब्लड शुगर वारंवार जास्त येत असेल तर आहारातील कार्बोहायड्रेटचं प्रमाण किंवा जेवणाच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज असू शकते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे-पवारांसारखा आणखी एक पक्ष फुटणार, ५० आमदार बंडखोरीच्या तयारीत, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: आयात शुल्लकामुळे कापसाचे दर पडले,शेतकरीवर्ग चिंतेत

Period Acne: पीरियड्स येण्यापूर्वी चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली 'ही' ५ मुख्य कारणं

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीच्या आईच्या घरी चोरी, लग्जरी घड्याळे अन् दागिन्यांवर चोरांनी मारला डल्ला

Mumbai : मुंबईत खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा फसला जाळ्यात

SCROLL FOR NEXT