Hypertension Symptoms: शरीरात दिसतायत ही ५ बदलती लक्षणं? वेळेत ओळखा वाढलेल्या ब्लड प्रेशरचा धोका

Surabhi Jayashree Jagdish

हाय ब्लड प्रेशर

जीवनशैली, तणाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हाय ब्लड प्रेशरची वाढताना दिसत आहे. कोलेस्ट्रॉलप्रमाणे ब्लड प्रेशरलाही सायलेंट किलर मानलं जातं. याची लक्षणं नेमकी काय आहे ती पाहूयात.

Silent Killer Disease

वारंवार डोकेदुखी होणं

डोकेदुखी ही सामान्य समस्या असली तरी सतत किंवा सकाळच्या वेळेस तीव्र डोकेदुखी होत असेल तर ते उच्च रक्तदाबाचं लक्षण असू शकतं. मेंदूतील रक्तवाहिन्यांवर वाढलेल्या दाबामुळे ही समस्या निर्माण होते. सतत डोकं दुखत असेल तर रक्तदाब तपासून घेणं गरजेचं आहे.

Blood Pressure Warning Signs

दृष्टी धूसर होणं

उच्च रक्तदाबाचा परिणाम डोळ्यांवरही होऊ शकतो. रक्तवाहिन्यांचं नुकसान झाल्याने दृष्टी धूसर दिसणं, दुहेरी दिसणं किंवा काही वेळेस तात्पुरती दृष्टी कमी होणं अशी लक्षणं जाणवू शकतात.

Severe Headache

छातीत दुखणं

छातीत वेदना किंवा दडपण जाणवत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. प्रत्येक वेळी हे उच्च रक्तदाबाशी संबंधित असेलच असे नाही, पण सतत छातीत दुखत असेल तर हृदयावर ताण वाढल्याचे संकेत असू शकतात.

Chest Pain

श्वास घेण्यास त्रास होणं

सामान्य काम करतानाही दम लागणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं हेही उच्च रक्तदाबाचं लक्षणं असतं. हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे शरीरात द्रव साचू लागतो. यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

Breathing Problems

तपासणी

नियमित रक्तदाब तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि तणाव नियंत्रण यामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येतं. शरीरात दिसणाऱ्या या संकेतांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे.

Fatigue Symptoms

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Weak heart signs | saam tv
येथे क्लिक करा