What is Keto diet, weight loss diet plan in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Keto diet : किटो डाएट म्हणजे काय ? ते कोणत्या व्यक्तींनी करु नये?

सध्याच्या परिस्थितीत आपले वजन कमी करण्यासाठी आपण सगळेच काही ना काही करत असतो.

कोमल दामुद्रे

मुंबई : सध्याच्या परिस्थितीत आपले वजन कमी करण्यासाठी आपण सगळेच काही ना काही करत असतो. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण योग व व्यायाम करतो तरीही आपले वजन कमी होत नाही.(What is Keto diet?)

हे देखील पहा -

वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लान करतात. डाएट करण्यासाठी आहारात अनेक वेगवेगळे पदार्थांचा समावेश करतात. आहारातील बदलामुळे काही अंशी आपले वजनही कमी होते. जाणून घेऊया अशाच एका डाएटविषयी.

किटो डाएट म्हणजे काय ?

किटो डाएट हा जास्त चरबी व कमी कार्बचा आहार आहे. ज्यामध्ये आपल्या आहारातून ७५ टक्के चरबी, ५ ते १० कार्ब व २० टक्के प्रथिने असे पदार्थ यात घेतले जातात. आहारात कार्बचे प्रमाण कमी झाल्यावर शरीर ऊर्जेसाठी चरबीवर अवलंबून असते. जास्त चरबीयुक्त आहार घेतल्याने शरीरात हळूहळू किटोन्स तयार होऊ लागतात. हे किटोन्स आपल्या शरीरातील चरबी जाळून ऊर्जा देते ज्यामुळे हळूहळू वजन कमी होऊ लागते. अलीकडच्या काळात, जगभरातील लोकांनी वजन कमी करण्यासाठी किटो आहाराचा अवलंब केला आहे. पण हा किटो आहार प्रत्येकासाठी योग्य नाही.

कोणत्या व्यक्तींना किटो डाएट करु नये-

१. गरोदर किंवा बाळाला दूध पाजणाऱ्या महिलांनी किटो डाएट करु नये. आपले अशा दिवसात आपले वजन वाढते परंतु, किटो डाएट केल्याने त्याचा परिणाम आपल्या बाळावर होऊ शकतो. तसेच यादरम्यान कमी कार्बयुक्त पदार्थांचे सेवन घेतल्यास शरीरात पुरेशी ऊर्जा निर्माण होत नाही. त्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या बाळावर होऊ शकतो.

२. आपल्याला आरोग्याचा बाबतीत काही तक्रारारी असतील किंवा आपली सध्या कोणती सर्जरी झाली असेल तर अशा व्यक्तींनी किटो डाएट करु नये. सर्जरी केल्यानंतर आपले शरीर कमकुवत होऊ लागते त्यामुळे आपल्या भरपूर जीवनसत्त्व व कॅलरी असणाऱ्या पदार्थाचे सेवन करायला हवे.

३. १८ वर्षापेक्षा कमी असणाऱ्या मुलांनी (Child) किटो डाएट करु नये. त्यामुळे याचा परिणाम मुलांच्या वाढीवर व आरोग्यावर होऊ शकतो. वाढत्या वयात मुलांना अधिक जीवनसत्त्वे (Vitamins) व कार्ब्सची गरज असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? आत्ताच हा यशाचा मंत्र लक्षात ठेवा

Thane : आई की, हैवान? ठाण्यातील महिलेचा लेकीला अमानुष मारहाण करतानाचा Video Viral

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Ashadhi Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

SCROLL FOR NEXT