Immunity System: आपली प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर दिसू शकतात आजाराची ही लक्षणे

ऋतूमानाच्या बदलानुसार त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो.
How to boost immunity system, symptoms of poor immunity, signs of weak immunity, weak immune system symptoms
How to boost immunity system, symptoms of poor immunity, signs of weak immunity, weak immune system symptomsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : ऋतूमानाच्या बदलानुसार त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मजबूत असणे अधिक गरजेचे आहे.(causes of weak immune system)

हे देखील पहा -

आपल्या शरीरातली रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर आपल्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते. सतत ध्रुमपान, मद्यपान, जंक फूड व वाढलेल्या वजनामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते व त्यामुळे आपल्याला इतर आजारांना (Disease) बळी पडावे लागते. आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे आपल्याला कोणते आजार होऊ शकतात हे पाहूया.(weak immune system symptoms)

१. आपल्या सतत कफ किंवा पोटदुखीचा त्रास होत असेल तर आपली प्रतिकारशक्ती कमी झाली हे समजावे. बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव आपल्या आतड्यांना इतर आजारांपासून लढण्यास मदत करतात परंतु, आपली प्रतिकारशक्ती (Immune system) कमकुवत असेल तर आपल्याला पोटाचा किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.

२. आपल्याला काही कारण नसताना अधिक ताण येऊ लागतो. सतत चिडचिड होऊ लागते. आपली प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर ही लक्षणे आढळू लागतात. तणाव आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते त्यासाठी आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवणे अधिक गरजेचे आहे.

३. ऋतूमानानुसार आपल्याला सतत सर्दी-खोकला होणे व त्याला बरे होण्यास अधिक काळ लागत असेल तर आपली प्रतिकारशक्ती कमी होत जाते त्यासाठी वेळीच डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

४. बऱ्याच वेळा आपल्याला काही लागल्यावर किंवा भाजल्यावर ती जखम लवकर भरून निघत नाही. त्यासाठी त्याचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो. त्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेते आहे.

५. काही काम केल्यानंतर अस्वस्थत वाटणे किंवा लगेच थकणे ही देखील प्रतिकारशक्ती कमी झाल्याची लक्षणे असू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com