Devshayani Ekadashi saam tv
लाईफस्टाईल

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Devshayani Ekadashi: हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. वर्षातून २४ एकादशी येतात, त्यापैकी 'देवशयनी एकादशी' ही अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानली जाते. या एकादशीपासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेसाठी जातात, म्हणूनच या तिथीला 'देवशयनी' असे म्हटले जाते.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात येणारी शुद्ध एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. यावर्षी ही एकादशी रविवारी म्हणजेच ६ जुलै २०२५ रविवार रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. शिवाय याच वेळी चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून मांगलिक कामांवर निर्बंध येणारा काळ.

देवशयनी एकादशीचे महत्व

देवशयनी एकादशी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू या दिवशी क्षीरसागरात शेषनागावर झोपतात आणि चार महिने योगनिद्रेत राहतात. या चार महिन्यांत विवाह, मुंडन, गृहप्रवेश, वास्तुशांती, नववधू प्रवेश यांसारख्या शुभकार्यांवर बंदी असते. कारण देव झोपलेले असताना शुभ कार्य करणं अपशकुन मानलं जातं.

व्रत आणि पूजेचं महत्त्व

देवशयनी एकादशीला उपवास केल्याने फार मोठं पुण्य मिळतं, असं मानण्यात येतं. असं म्हणतात की, या दिवशी भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा केल्यास सर्व पापं धुतली जातात. याशिवाय सर्व अडचणी दूर होतात. जीवनात येणारे अडथळे दूर होतात आणि इच्छित फळाची प्राप्ती होते.

या दिवशी काय करावं?

या दिवशी भक्तांनी उपवास करून सकाळपासून भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन राहावं. यावेळी त्यांच्या प्रतीमा अथवा फोटोसमोर तुलसी पत्र, फळ, पिवळा फुलं, पिवळा नैवेद्य अर्पण करून विधीवत पूजा करावी. विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू स्तोत्राचं पठण केल्याने अधिक पुण्य मिळतं.

यंदाच्या वर्षी आहे विशेष योग

२०२५ मध्ये देवशयनी एकादशीच्या दिवशी रवि योग देखील निर्माण होतोय. जो फारच शुभ मानला जातो. हा शुभ संयोग चांगल्या गोष्टींची सुरुवात, मानसिक शांती, आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी लाभदायक मानला जातो. या दिवशी केलेल्या संकल्पांचा फलप्राप्तीवर परिणाम अधिक प्रभावी असतो, असं ज्योतिष मानतात.

पूजेची वेळ आणि शुभ मुहूर्त

  • एकादशी तिथी सुरू- ५ जुलै शनिवार, संध्याकाळी ६:२८ वाजता

  • एकादशी तिथी समाप्त- ६ जुलै रविवार, रात्री ८:२२ वाजता

  • पूजा करण्याचा शुभ मुहूर्त- सकाळी ६:५६ ते ११:५९ या वेळेत

  • अभिजीत मुहूर्त: दुपारी ११:३३ ते १२:२७

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT