Combing Hair  Saam Tv
लाईफस्टाईल

Combing Hair : केस विंचरण्याची योग्य पद्धत काय आहे? जाणून घ्या फायदे

Benefits Of Combing Hairs : आपला परफेक्ट लूक दिसण्यासाठी केस सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Combing Hairs For Health : आपला परफेक्ट लूक दिसण्यासाठी केस सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यासाठी केवळ मेकअप करून चेहरा चांगला दिसत नाही तर केस देखील व्यवस्थित असणे गरजेचे असते म्हणून केसांची वेळोवेळी काळजी घेणे आवश्यक असते.

धावपळीच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) किंवा आळसपणामुळे अनेक महिला केस व्यवस्थित विचरत नाहीत म्हणून केस अव्यवस्थित दिसतात. त्यामुळे केस तुटणे केस गळणे आणि केसांच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला केस विंचरण्याची आवश्यकता का आहे आणि याचा केसांच्या आरोग्यावर (Health) कसा परिणाम होतो हे सांगणार आहोत.

केस विंचरण्याची आवश्यकता का?

स्काल्पमधून केसांना पोषक तत्वे मिळतात आणि टाळूमध्ये रक्तभिसरण व्यवस्थित होते त्यामुळे केसांच्या आरोग्यावरच चांगला परिणाम होतो. जर टाळूवर रक्तभिसरण नीट झाले नाही तर केसांचे कुप अडकतात आणि स्काल्पमध्ये वेदना होऊ शकतात.

तुम्ही जर खूप दिवस केस स्वच्छ केले नसेल आणि केस विचरले नसेल किंवा केस खूप घट्ट बांधले असतील,तेव्हा केसांतून बोटे फिरवताना तुम्हाला वेदना जाणवतात.त्याचे कारण म्हणजे रक्तपरिसंचरण सुरळीत नसते.

रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरायचे की नाही?

रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरायला काही हरकत नाही पण रात्री झोपण्यापूर्वी केस जास्त घट्ट बांधू नये,केस घट्ट बांधल्याने केस मुळापासून कमकुवत होतात तसेच असे केल्याने रक्ताभिसरण नीट होत नाही आणि डोकेदुखी सुरू होऊ शकते.

तुमचे केस ओले असल्यास, ते ९० टक्के कोरडे होईपर्यंत विंचरू नका कारण ओले केस विंचरलयाने ते अधिक प्रमाणत तुटतात. रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावल्यानंतर कंगवा केल्याने केसांवर चांगला परिणाम होतो. केस मजबूत राहण्यास मदत मिळते सोबतच केसांना डीप कंडिशनिंग देखील मिळते.

केसांवर कोणत्या प्रकारचा कंगवा वापरावा?

केसांमध्ये कडक दात असलेला कंगवा वापरू नये त्याने टाळूवर जखमा होऊन केसांच्या कूपांना नुकसान होते.केसांमध्ये फक्त मऊ दात असलेला कंगवा वापरणे अधिक चांगले आहे. जर तुमचे केस खूपच जास्ती गुंफलेले असतील तर प्रथम हाताच्या बोटांनी केस मोकळे करून घ्यावी आणि त्यानंतर कंगव्याच्या साहाय्याने केस सेट करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

SCROLL FOR NEXT