
Bhirngraj Oil Uses : सुंदर काळे घनदाट केस कोणाला नको असतात. त्यासाठी केसांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे पण आताच्या अनिश्चित जीवनशैलीमुळे आणि बाहेर प्रदूषणामुळे हल्ली केसाच्या समस्या खूप जास्त निर्माण होतात.
बाजारात केसांची काळजी घेण्यासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध असतात म्हणून बऱ्याच वेळा आपला गोंधळ उडतो की नक्की कोणते प्रॉडक्ट (Product) वापरायचे. त्यात त्या प्रॉडक्टमध्ये भरपूर प्रमाणात केमिकलचा वापर केलेला असतो त्यामुळे त्या प्रॉडक्टचा आपल्या केसांवर नकारात्मक परिणाम देखील होण्याची शक्यता असते.
तर अशा वेळी तुम्ही आयुर्वेदिक उपाय करून केसाच्या सर्व समस्या केस गळणे, कोंडा, खराब झालेले केस इत्यादी. कालांतराने या सर्व समस्या केसांच्या वाढीवर परिणाम करतात त्यामुळे भृंगराज या औषधाचा वापर करून केसांच्या (Hair) सर्व समस्या सहज सोडतील.
केसांसाठी भृंगराज -
एकल्बिटा अल्बा याला भृंगराज म्हणून ओळखतात. औषधांसाठी प्रसिद्ध अशी ही वनस्पती,यात केसांसाठी आवश्यक सर्व गुणधर्म उपलब्ध आहेत. ही वनस्पती त्याच्या औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे तसेच या वनस्पती चा उल्लेख केसांचा राजा म्हणून केला जातो.
केसांच्या वाढीसाठी भृंगराज वापरण्याची पद्धत -
केसांसाठी या औषधांचा वापर करायचा असेल तर भृंगराज तेल तुम्ही वापरू शकत. तुम्हाला ते तेल बाजारात सहज उपलब्ध होईल. भृंगराज तेलाने केसांची मालिश करण्याची पद्धत जाणून घेऊ.
1. तेल लावण्यापूर्वी केसांचा गुंता सोडून घ्या.
2. केसांसाठी भृंगराज तेलाचा वापर करण्या अगोदर हे तेल मध्यम आचेवर गरम करून घेणे गरजेचे आहे.
3. त्यानंतर टाळूवर हे भृंगराज तेल टाकून हळूहळू स्कॅलपवर मालिश करायला सुरू करा.
4. त्यानंतर संपूर्ण केसांना व्यवस्थित तेल लावून मुळापासून मालिश करा.
5. नंतर चार-पाच तास झाल्याने केस धुवून घ्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.