Chest Burning and Pain google
लाईफस्टाईल

Chest Pain Symptoms: छातीत सतत चमक-जळजळ होण्याचे कारण काय? असू शकतो 'या' आजाराचा धोका, तज्ज्ञांनी दिली माहिती

Lung Cancer Symptoms: छातीत जळजळ, खोल वेदना किंवा श्वास घेताना त्रास हा साधा आजार नसून फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. तज्ज्ञांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे असा सल्ला दिला आहे.

Sakshi Sunil Jadhav

  • छातीत जळजळ, जळजळ किंवा खोल वेदना हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.

  • अशी वेदना सामान्य आम्लपित्त किंवा स्ट्रेसमुळे होणाऱ्या वेदनेसारखी नसते.

  • भारतात चुकीच्या निदानामुळे अनेक रुग्णांना उशिरा रोग समजतो.

छातीचे दुखणे हे सगळ्यांसाठी धक्कादायक आणि इतर सामान्य आजारांपेक्षा गंभीर असते. त्यात थंडीच्या दिवसात शरीरातील रक्त गोठण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू शकतात. मात्र छातीत चमका मारणे, जळजळ होणे ही समस्या नसून फुफ्फुसाच्या कॅन्सरचे (lung cancer) लक्षण असू शकते. बहुतेक वेळा स्ट्रेस, आम्लपित्त किंवा सीझनल अस्थमा म्हणून दुर्लक्ष केले जाणारे हे लक्षण फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सुरुवातीचेच संकेत असू शकतात, असा इशारा एक नामांकित कॅन्सर स्पेशॅलिस्ट यांनी दिला.

Indiatoday.in ला दिलेल्या मुलाखतीत HCG कॅन्सर हॉस्पिटल, कोलकत्ता येथील सीनियर कन्सल्टंट, रेडिएशन ऑनकोलॉजी विभागाचे डॉ. अभिजीत दास यांनी फुफ्फुसाच्या कॅन्सरचे अनेक रुग्ण उशिरा का निदान होतात आणि कोणती लक्षणे तातडीने तपासण्याची गरज असते याबद्दल माहिती दिली.

तज्ज्ञांच्या मते, छातीतील अस्वस्थता अनेक रुग्ण साध्या समस्या समजून दुर्लक्षित करतात. फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होणारी छातीतली वेदना सतत, खोल आणि वेळ जसजसा जातो तशी वाढणारी असते. ही वेदना ताणामुळे होणाऱ्या घट्टपणासारखी किंवा आम्लपित्तामुळे होणाऱ्या जळजळीप्रमाणे नसते असे ते सांगतात. ही वेदना शांत बसल्यावर किंवा अँटासिड घेतल्यावरही कमी होत नाही, हेच तिचे वेगळेपण आहे. अनेक रुग्ण श्वास घेण्यावर, झोपेत किंवा दैनंदिन कामात अडथळा येऊ लागल्यावरच डॉक्टरांकडे जातात, तेव्हा आजार बऱ्यापैकी वाढलेला असतो.

फुफ्फुसाच्या कर्करोगाची सुरुवातीची अवस्था जवळपास सामान्य असते. लवकरच्या टप्प्यात श्वास घ्यायला त्रास जाणवत नाही, असे डॉ. दास स्पष्ट करतात. कारण छोटे ट्यूमर श्वसनमार्ग अडवत नाहीत. त्यामुळे भारतात कमी स्क्रीनिंगमुळे अनेक रुग्णांचे निदान उशिरा होते.

छातीतील वेदनेची काही स्वरूपं विशेष लक्ष देण्यासारखी आहेत. खोल श्वास घेतल्यावर वाढणारी वेदना फुफ्फुसाभोवतालच्या आवरणात सूज किंवा इन्फ्लेमेशन दर्शवू शकते. खोकल्याने किंवा हसल्याने वाढणारी वेदना फुफ्फुसाशी संबंधित असेल अशी शक्यता अधिक असते. रात्री वाढणारी वेदना किंवा झोपताना त्रास देणारा दाब, खांदा किंवा पाठीपर्यंत जाणारी टोचणी ही लक्षणे काही आठवडे टिकली किंवा वाढली तर तातडीने तपासणी करणे आवश्यक आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महापालिकेसाठी भाजपचा नवा प्लॅन, ठाकरेंच्या रणनीतीला भाजपचा शह?

Maharashtra Corporation Election: मोठी बातमी! आमदार, खासदारांच्या पोरांना तिकीट नकोच; ऐननिवडणुकीत भाजपचा निर्णय

राज ठाकरेंच्या मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाला कुठून संधी?

Kala Vatana Rassa Recipe: काळा वटाणा रस्सा भाजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीच्या चर्चेत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT