What is Washroom  Saam TV
लाईफस्टाईल

What is Washroom : बाथरूम आणि वॉशरूम दोघांमध्ये फरक तरी काय? वाचा आणि जाणून घ्या

Difference Between Bathroom and Washroom : अनेक व्यक्ती बाथरूम किंवा टॉयलेटला देखील वॉशरूम असा शब्द वापरतात. त्यामुळेच आज या तिन्ही गोष्टींमधील फरक जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

पूर्वीच्या काळी जागा कमी असल्याने तसेच गावी घरी मातीची घरे असल्याने व्यक्ती घरामध्ये टॉयलेट बांधत नव्हते. टॉयलेट नेहमी घरापासून काही अंतर बाहेर असायचे. आता मुंबईत असे नसते. येथे टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही देखील घरातच असतात. अशात सध्या अनेक व्यक्ती बाथरूमला किंवा टॉयलेटला वॉशरूम म्हणतात.

वॉशरूम शब्द वापरणे किंवा लिहिणी याचा सध्या ट्रेंण्ड असल्याचं दिसत आहे. अनेक व्यक्ती बाथरूम किंवा टॉयलेटला देखील वॉशरूम असा शब्द वापरतात. कारण त्यांना या तिघांमध्ये नेमका फरक तरी काय आहे हेच समजत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला या तिन्ही गोष्टींमधील फरक सांगणार आहोत.

बाथरूममध्ये काय असतं?

बाथरूम म्हणजे स्नानगृह होय. पूर्वीच्या काळी घरांमध्ये फक्त स्नान गृह असायचे. येथे अंधोळीचा साबण, शँम्पू, दात घासण्यासाठी साहित्य, टप, मग, बकेट इत्यादी साहित्य असते. अशा खोलीला बाथरूम म्हणटलं जातं.

टॉयलेट

टॉयलेट हा इंग्रजी शब्द आहे. या खोलीत तुम्ही फक्त शौचालयास जाऊ शकता. जागेच्या अभावामुळे काही ठिकाणी बाथरुममध्येच टॉयलेट देखील जोडलेले असते.

वॉशरूम म्हणजे काय?

आता टॉयलेट आणि बाथरूम तर समजलं, पण मग वॉशरूम म्हणजे काय असा प्रश्न अजूनही तुमच्या मनात असेल. तर त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत. वॉशरूम म्हणजे अशी जागा जेथे तुम्ही काही वेळ थांबू शकता, बसू शकता. येथे शौचालय, आरसा आणि कपडे बदलण्यासाठी मोठी स्पेस असते. त्यामुळे तुम्ही येथे थोडा वेळ सुद्धा घालवू शकता, त्याला वॉशरूम असं म्हणतात.

व्यक्तीच्या लिंगानुसार देखील काही ठिकाणी वेगवेळे स्वच्छतागृह असतात. विशेषता मॉलमध्ये तुम्हाला लिंगाप्रमाणे वेगळी स्वच्छतागृहे पाहायला मिळतील त्याला देखील वॉशरूम असं म्हटलं जातं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज

NCP Ajit Pawar : अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर; सात नावांचा समावेश

Armaan Malik: युट्युबर अरमान मलिकने केलं चौथं लग्न? करवा चौथच्या त्या व्हिडीओमुळे एकच चर्चा

SCROLL FOR NEXT