वास्तूशास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपल्यावर भाग्याशी संबंध असतो. घरामध्ये सर्वकाही सुरळीत असताना अचानक मोठी संकटे येऊ लागतात. घरामध्ये पंचतत्वांचा समावेश असतो त्यासाठी याचे संतुलन ठेवणे देखील गरजेचे आहे.
घरातील ऊर्जेचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावरही होतो. वास्तू बिघडली तर कुटुंबाच्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी बाथरुममध्ये ठेवू नयेत. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो. तसेच वास्तू दोष देखील निर्माण होतो. कुटुंबावर आर्थिक संकट येऊन सुख-समृद्धी नाहीशी होते. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी बाथरुममध्ये ठेवू नये.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तुटलेली काच किंवा आरसा बाथरुममध्येच नाही तर घराच्या (Home) कोणत्याही कोपऱ्यात ठेवू नका. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कोणतेही काम करताना अडथळे येतात.
बाथरुममध्ये कधीही रिकामी बादली ठेवू नका. सकाळी उठल्यानंतर रिकामी बादली पाहिल्याने तुमचा खिसा रिकामा होऊ शकतो. त्यामुळे बादलीत थोड्या प्रमाणात पाणी (Water) असायला हवे. त्याचप्रमाणे बाथरुममध्ये तुटलेली बादली ठेवणे अशुभ मानले जाते.
बाथरुममध्ये कोणतेही रोपटे (Plant) ठेवू नका. त्याचबरोबर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कोरडी रोपे ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करा.
बाथरुममध्ये खराब नळ असेल तर तो आजच काढून टाका. ज्यामुळे वास्तूदोष निर्माण होतो. बाथरुममधील नळातून पाणी सतत टपकत राहिल्यास नकारात्मक ऊर्जा पसरते. तसेच आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.