Bluebugging  Saam Tv
लाईफस्टाईल

Beware Of Bluebugging : तुम्हालाही वारंवार Bluetooth ऑन ठेवायची सवय आहे? ब्लू बबिंगद्वारे होऊ शकतो मोबाईल हॅक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bluebugging Attack News :

स्मार्टफोनमध्ये नेहमीच नवीन फिचर अपडेट होत असतात. अनेकदा आपण वेगवेगळे अॅप किंवा फिचर चालू ठेवतो. त्यात वायफाय,मोबाईल डेटा आणि ब्लूट्यूथचा समावेश असतो. पण यामुळे तुमच्यासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे तुम्ही हॅकिंगचे बळी ठरु शकता.

ब्लूट्यूथ वैशिष्ट्य सर्व स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे, जे इअरबड्स, TWS आणि स्मार्टवॉच इत्यादी इतर उत्पादनांना जोडण्याची परवानगी देते. अशा परिस्थितीत बरेच लोक नेहमी हे फिचर ऑन ठेवतात.त्यामुळे तूम्ही ब्लूबबिंग या धोक्याचे बळी होऊ शकता.

हॅकर्स तूमचे ब्लूट्यूथ शोधून मोबाईल हॅक करु शकतात.यासह हॅकर्स तूमच्या मोबाईल आणि बॅकेची माहितीदेखील काढू शकतात.हॅकर्स मोबाईलमध्ये स्पाय अॅप्सदेखील डाउनलोड करु शकतात. ब्लूट्यूथ चालू ठेवणे हे तूमच्यासाठी धोक्याचे ठरु शकते.

ब्लूबबिंग म्हणजे नक्की काय?

ब्लूबबिंग हा हॅकिंगचा एक प्रकार आहे.हे यूजर्ससाठी धोक्याचे ठरु शकते.यामध्ये हॅकर्स यूजर्सच्या डिवाईसचा वापर करुन कंटेट अॅक्सेस करुन मोबाईलचा वापर करु शकतात.बॅंक अॅप आणि बॅंक वॉलेट अॅपदेखील अॅक्सेस करु शकतात. ब्लूबबिंगद्वारे युजर्सच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल केले जाते.

सर्वप्रथम हॅकर्स ब्लूट्यूथ पाहून तूमच्या मोबाईलशी कनेक्ट होतात. ते तूमच्या फोनचे लॉकदेखील बायपास करतात.त्यामुळे तूमच्या फोनवर हॅकर्सने नवीन कोणतेतरी कनेक्शन तयार केले आहे. हे कळत नाही.

कनेक्शन झाल्यानंतर हॅकर्स फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करतात.त्यानंतर फोनमध्ये परमिशन घेतात. परमिशन घेतल्यावर हॅकर्स तूमच्या फोनमधील सर्व फोटोदेखील पाहू शकतात.एकदा फोनचे सर्व नियंत्रण प्राप्त झाल्यावर हॅकर्स तूमच्या फोनमधील कॉल रेकॉर्डपासून ते स्क्रीन रेकॉर्डिंगर्यंत सर्व पाहू शकतात. ब्लूबबिंगबाबत पोलिसांनी अनेकदा सूचनाही दिल्या आहेत.

ब्लूबबिंग कसे टाळायचे?

  • ब्लूबबिंग टाळायचे असेल तर सर्वात आधी कोणत्याही डिव्हाइवरुन कनेक्शन जोडण्याची परमिशल स्वीकारु नये.अनेकदा परमिशन न पाहताच हॅकर्स मोबाईलमध्ये हस्तक्षेप करतात.त्यामुळे आवश्यकता नसल्यास ब्लूट्यूथ बंद ठेवा.

  • वापरात नसलेले जोडले गेलेले ब्लूट्यूथ डिव्हाइस काढून टाका.

  • ब्लूट्यूथ सेटिंगवर जाऊन ऑटो जॉईन पर्याय बंद करा. ते तूमच्यासाठी धोक्याचे ठरेल.

  • ब्ल्यूट्यूथ कनेक्शनसाठी चांगला पासवर्ड ठेवा.

  • डिव्हाइसचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.शक्य असल्यास VPN नेटवर्क वापरा.

  • सार्वजनिक ठिकाणी ब्लूट्यूथ बंद ठेवा.

  • ब्लूट्यूथ वरुन डाउनलोड केल्या जाणाऱ्या फाईल्स तपासा.जेणेकरुन काही संशयास्पद आढळल्यास लगेचच ती फाईल डिलिट करु शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT