Android युजर्ससाठी लवकरच नवीन फिचर लॉन्च होणार आहे. Android युजर्संना Android 14 सह सॅटेलाईट एसएमएस करण्याचा सपोर्ट मिळेल.एका अहवालानुसार, सॅटेलाईट फीचर असलेले Pixel आणि Galaxy फोन सॅटेलाईटद्वारे एसएमएसला सपोर्ट करणारे हे पहिले अँड्रॉइड मॉडेल असतील. अहवालानुसार, एसएमएस सॅटेलाईट अँड्रॉइडमध्ये जोडला जाईल. याचा उपयोग करण्यासाठी एका हार्डवेअरची गरज असेल.
अँड्रॉइड 14 लवकरच मोबाईल फोनवर सॅटेलाईट वैशिष्ट्याद्वारे एसएमएसला पाठिंबा देईल. एका रिपोर्टनुसार, यूजर्सना लवकरच Android 14 सह सॅटेलाईट एसएमएसचा सपोर्ट मिळेल. हे अपडेट आल्यानंतर,युजर्स एसएमएस मॅसेज पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी आपल्या डिवाइसचा वापर करता येणार आहे.सेल्युलर नेटवर्क नसतानाही युजर्स सहजपणे कॉल आणि मॅसेज करू शकतील.
1. सॅटेलाइट वैशिष्ट्य अँड्रॉइड 14 मध्ये उपलब्ध असणार
एका अहवालानुसार, सॅटेलाईट फीचर पिक्सेल आणि गॅलेक्सी फोन हे सॅटेलाईटद्वारे एसएमएसला सपोर्ट करणारे पहिले अँड्रॉइड मॉडेल असतील. एसएमएस सॅटेलाईट अँड्रॉइडमध्ये समावेश केला जाईल आणि त्याला योग्य हार्डवेअरची आवश्यकता असेल. Android 14 च्या हे अपडेट लवकरच उपलब्ध होणार आहे. अॅन्ड्राइडचे सॅटेलाईट फिचर येत्या २ ते ३ आठवड्यात लॉन्च होणार आहे.
2. वैशिष्टे
Apple इमरजन्सी एसओएस सॅटेलाईट अॅपल वापरणाऱ्या युजर्सना नेहमी संकटातच्या काळात मदत करते.जर युजर्संना व्हॉईस कॉल आणि इंटरनेटसाठी सॅटेलाईट सर्विस ऑफर केली गेली तर ह सर्विस सेल फोन सेवा नसलेल्या ठिकाणी उपयुक्त ठरेल. अॅपलच्या इमर्जन्सी एसओएस वैशिष्ट्याबद्दल बोलायचे तर, हे वैशिष्ट्य सध्या फक्त अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड आणि यूके सारख्या देशांमध्ये उपलब्ध आहे.
3. Android 14 मध्ये साइडलोडिंग अॅपवर सूचना मिळणार
Android 14 मध्ये गुगल यूजर्सना तिसऱ्या पार्टीकडून डाउनलोड करताना सूचना करणार. Android यूजर्स हे अॅप कोणत्याही अडथळ्याशिवाय वापरु शकतात.हे अॅप डाउनलोड करताना एक साधी सूचना येईन ज्याला आपण दुर्लक्ष करु शकतो.असे अॅप डाउनलोड करताना गुगल प्ले स्टोरवरुन डाउनलोड करा असा सल्ला हे फिचर देईन.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.